Uncategorizedकोपरगाव तालुकानगर जिल्हा
आत्मा मालिक ध्यानपिठाच्या वतीने पूरग्रस्तांना राहण्याची व भोजनाची केली व्यवस्था.
कोपरगाव (प्रतिनिधी)कोपरगाव शहरासह तालुक्यामध्ये गोदावरी नदीला पूर आल्याने शेकडो कुटुंब उघड्यावर पडले आहेत. पुराच्या पाण्यामध्ये अनेकांचे घर गेल्याने त्यांच्या राहण्या-खाण्याची अडचण होत आहे अशा स्थितीत या पूरग्रस्त कुटुंबाला भोजनाची व राहण्याची व्यवस्था विश्वात्मक जंगली महाराज आश्रम ट्रस्ट कोकमठाण आत्मा मालिक ध्यानपीठ यांच्यावतीने करण्यात आली .तालुक्यातील कोकमठाण ,बेट नाका ,पुणतांबा ,शिंगवे आधी परिसरातील आपत्तीग्रस्त नागरिकांना मदतीचा हात देत त्यांच्या भोजनाची व्यवस्था प्रत्यक्ष जागेवर जाऊन आत्मा मालिक ध्यानपीठाच्या वतीने करण्यात आली. आश्रमाचे संत परमानंद महाराज, संत निजानंद महाराज , संत विवेकानंद महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली ध्यानपीठाचे विश्वस्त व भोजनालयाचे प्रमुख प्रकाश भट यांनी विशेष परिश्रम घेऊन पूरग्रस्तांच्या मदतीसाठी पुढाकार घेतला. भोजनालय चे व्यवस्थापक नितीन शिंदे,आश्रमाचे व्यवस्थापक हिरामण कोल्हे, विश्वस्त विठ्ठलराव होन, हनुमंत भोंगळे प्रकाश गिरमे, बाळासाहेब गोर्डे, प्राचार्य सुधाकर मलीक आदींनी सहकार्य केले.
दरम्यान पूरग्रस्त नागरिकांना आत्मा मालिक ध्यानपीठ कोकमठाण येथे निवासाची व भोजनाची व्यवस्था करण्यात आली असून गरजूंनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन व्यवस्थापक हिरामण कोल्हे यांनी केली आहे. तर पुराच्या पाण्यामुळे ज्यांची भोजनाची व्यवस्था नसेल त्या नागरिकांनी आत्मा मालिक ध्यानपिठाशी त्वरीत संपर्क साधावा आपत्तीग्रस्तांना त्यांच्या जागेवर भोजनाची व्यवस्था करण्यात येईल तरी आपत्तीग्रस्तांनी ९३७२९५१०१४ या नंबर वरती संपर्क साधून मदत घ्यावी असे आवाहन करण्यात आले आहे .संकटात सापडलेल्या आपत्तीग्रस्तांना मदत करण्यासाठी आत्मा मालिक ध्यान पिठाच्या वतीने पुढाकार घेण्यात आल्याने पूरग्रस्तांना दिलासा मिळाला आहे