जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
कामगार जगत

ग्रामसेवक संघटनेच्या तालुकाध्यक्षपदी पाडेकर यांची निवड

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)

अ.नगर जिल्हा ग्रामसेवक संघटनेच्या नुकत्याच पार पडलेल्या पदाधिकारी निवडीत कोपरगाव तालुका अध्यक्षपदी जालिंदर बाजीराव पाडेकर यांची निवड झाली असून उपाध्यक्षपदी संग्राम गोकुळदास बोर्डे यांची बिनविरोध निवड कारण्यात आली असल्याची माहिती संघटनेचे जेष्ठ नेते तथा ग्रामसेवक पतसंस्था संचालक गोरक्षनाथ शेळके यांनी दिली आहे.त्यांच्या निवडीचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

ग्रामसेवक संघटनेचे राज्याध्यक्ष एकनाथ ढाकणे यांच्या नेतृत्वाखाली सामाजिक बांधिलकी जपत संपुर्ण राज्यभरातील जवळपास २२ हजार ग्रामसेवकांची संघटना मानली जाते.त्याची शाखा अ.नगर जिल्ह्यासह कोपरगाव तालुक्यातही कार्यरत आहे.कोपरगाव तालुकाध्यक्षपदी जालिंदर पाडेकर यांची निवड झाले बद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

सदर निवड हि सन-२०२३ ते २०२८ अशा पाच वर्षासाठी झाली आहे.या निवड झालेल्या या बैठकीस तालुका महासंघाचे अध्यक्ष दिगंबर बनकर,अहमद शेख,सुरेश मंडलिक,सुनील नागरे,सुभाष गर्जे,अशोक नरसाळे,सचिन वीर,योगेश देशमुख,आर.पी.सय्यद,रामेश्वर नेवगे,महेंद्र काळे आदी मान्यवर उपस्थित होते.

सदर बैठकीत कार्यकारिणी मानद अध्यक्ष म्हणून बाबासाहेब मुरलीधर गुंड,सचिव नारायण दौलत खेडकर,महिला उपाध्यक्ष सुप्रिया रमेश टोरपे,कोषाध्यक्ष सोमनाथ भीमा पटाईत,प्रसिद्धी प्रमुख अविनाश सीताराम पगारे,संघटक किरण रामसिंग राठोड,कार्याध्यक्ष आर.एस.टिळेकर,व सल्लागार दिलीप बबनराव गायकवाड आदींची नेमणूक झाली आहे.

दरम्यान सदर बैठकीचे सुत्रसंचलन रमेश बांगर यांनी केले आहे तर उपस्थितांचे आभार नूतन अध्यक्ष जालिंदर पाडेकर यांनी मानले आहे.नूतन अध्यक्ष हे कोपरगाव तालुक्यातील डाऊच खुर्द येथे ग्रामविकास अधिकारी म्हणून कार्यरत आहेत.नूतन पदाधिकाऱ्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close