कामगार जगत
संवत्सर शिवारात वीज पडून तरुण ठार
न्यूजसेवा
संवत्सर-(प्रतिनिधी)
कोपरगाव तालुक्यात संवत्सर शिवारात आज दुपारी साडे तीन वाजेच्या सुमारास विजांसह आलेल्या पावसाने वीज पडून संवत्सर शिवारात लक्ष्मणवाडी या ठिकाणी विहिरीचे काम करत असलेला तरुण संतोष जाधव जागीच ठार झाला आहे तर त्याचा अन्य सहकारी सागर जाधव हा जखमी झाला असल्याची माहिती आमच्या प्रतिनिधीस प्राप्त झाली आहे.त्यामुळे संवत्सर शिवारात खळबळ उडाली आहे.
आज दुपारच्या सुमारास आकाश काळोख घेऊन आले होते.त्यावेळी आलेल्या पावसासोबत वीजाही पडल्या असून त्यात विहिरीचे काम करत असलेला दहीगाव बोलका येथील रहिवासी असलेला तरुण संवत्सर शिवारात अजय भाकरे या शेतकऱ्याच्या विहिरीचे काम करत असतांना त्या ठिकाणी कडकडाट करत वीज पडली त्या वेळी हे तरुण विहिरीतून बाहेर येऊन त्यांनी लिंबाच्या झाडाचा आश्रय घेतला होता त्यावेळी ही दुर्घटना घडली आहे.त्यात हा तरुण भाजून जगीच ठार झाला आहे.तर त्याचा सहकारी सागर जाधव हा जखमी झाला आहे.या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.