जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
निधन वार्ता

माजी नायब तहसीलदार रणशूर यांचे निधन

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव तहसीलचे माजी नायब तहसीलदार चंद्रकांत रणशूर (वय-८२) यांचे नुकतेच अल्पशा आजाराने आज सकाळी दहा वाजेच्या सुमारास औरंगाबाद येथे उपचार सुरू असताना निधन झाले आहे.ते आर.पी.आय.चे माजी शहराध्यक्ष जितेंद्र रणशूर यांचे पिताश्री होते.त्यांच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

स्व.चंद्रकांत रणशूर यांनी खातेनिहाय परीक्षेत ते १९७५ साली त्या वेळच्या पुणे विभागत प्रथम मिळवला होता. त्या नंतर नाशिक विभागात त्यांचा समावेश झाल्याने त्यांचा सेवेचा क्रमांक खालच्या स्तरात गेल्याने त्यांचे मोठे नुकसान झाले होते.त्या नंतर ते महसूल विभागात रूजू झाले होते.त्यांनी नव्वदच्या दशकांच्या कालखंडात १९८२ साली रुजू होऊन त्यांनी कोपरगाव तहसील कार्यालयात नायब तहसीलदार म्हणून सोळा वर्ष सेवा बजावली होती.महसूल सारख्या भ्रष्टाचारात अग्रणी असलेल्या महसूल विभागात असूनही “एक प्रमाणिक अधिकारी” म्हणून त्यांनी आपला लौकिक स्थापन केला होता.अबोल,मितभाषी व कामाचा उरक ही त्यांच्या कामाची वैशिष्ठे ठरली होती.

त्यांच्या सर्व धार्मिक विधींना फाटा देत त्यांनी व्यक्त केलेल्या अंतिम ईच्छेनुसार दुपारी ३.०० वा. प्रवरा मेडिकल ट्रस्टला देहदान करण्याकरिता त्यांच्या कृषी मित्र सोसायटी येथील निवासस्थानी मर्यादित कुटुंबातील सदस्यांच्या उपस्थितीत देहदानाचा विधी संपन्न झाला आहे.त्यांच्या पच्छात पत्नी,एक मुलगा,तीन मुली असा परिवार आहे.

त्यांच्या निधनाबद्दल आ.आशुतोष काळे,नगराध्यक्ष विजय वहाडणे,समता पतसंस्थेचे अध्यक्ष ओमप्रकाश कोयटे,राष्ट्रवादीचे जिल्हा कार्याध्यक्ष संदीप वर्पे,गटनेते विरेंन बोरावके,शहराध्यक्ष सुनील गंगूले आदींनी दुःख व्यक्त केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close