जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

सोमैय्या महाविद्यालयात पर्यावरण दिन उत्साहात साजरा

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव येथील राष्ट्रीय सेवा योजना,सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ व के.जे.सोमैया कला,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय,कोपरगाव यांच्या संयुक्त विद्यमाने नुकताच महाविद्यालय स्तरावर पर्यावरण दिन मोठ्या उत्साहात ऑनलाइन पद्धतीने साजरा करण्यात साजरा करण्यात आला आहे.

“पर्यावरण वाचविण्यासाठी एक नागरिक म्हणून आपली भूमिका या मध्ये फार महत्वाची आहे.हा ऱ्हास जर आपण थांबवू शकलो नाही तर अनेक नैसर्गिक आपत्ती आपली पाठ सोडणार नाहीत’-प्रा.डॉ.अयोध्या क्षिरसागर.

या वेळी ‘पर्यावरण आणि मी’ या विषयावर सी.टी.बोरा महाविद्यालय,शिरूर येथील वनस्पतिशास्त्र विषयाच्या प्रा.डॉ.अयोध्या शिरसागर मॅडम यांचे व्याख्यान अयोजित करण्यात आले होते.

त्या आपल्या व्याख्यानात बोलताना त्या म्हणाल्या की,” ‘पर्यावरण संवर्धनाची सुरुवात प्रत्यकाने स्वतःपासून केली पाहीजे.पर्यावरणाचा ऱ्हास सध्या होत आहे व एक नागरिक म्हणून आपली भूमिका या मध्ये फार महत्वाची आहे. हा ऱ्हास जर आपण थांबवू शकलो नाही तर अनेक नैसर्गिक आपत्ती आपली पाठ सोडणार नाहीत’,यांवर त्यांनी विद्यार्थ्यांचे लक्ष केंद्रित केले.’आपल्याला वाचायचे असेल तर आपण पर्यावरणाची काळजी घेतली पाहिजे’ असेही त्या म्हणाल्या.
या ऑनलाइन व्याख्यानाचे आयोजन राष्ट्रीय सेवा योजनेच्या वतीने करण्यात आले.

या प्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.बी.एस. यादव,उपप्राचार्य डाॅ.एस.आर.पगारे,राष्ट्रीय सेवा योजना जिल्हा समन्वयक एस.के.बनसोडे,महाविद्यालय अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष,समन्वयक प्रा.व्ही.सी.ठाणगे,कार्यालय अधीक्षक डाॅ.अभिजित नाईकवाडे,काय॔क्रम अधिकारी डाॅ. बी.एस.गायकवाड,डाॅ.एस.एस.नागरे,डाॅ. एस.बी.भिंगारदिवे,न्यू आट॔स,काॅमस॔ ऍण्ड सायन्स महाविद्यालय,अहमदनगर येथील कार्यकम अधिकारी प्रा.डाॅ.गणेश निमसे, इतर प्राध्यापक व राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक व इतर विद्यार्थी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन व प्रास्ताविक डॉ.बी.एस. गायकवाड यांनी केले तर डाॅ.एस.एस.नागरे यांनी उपस्थितांचे आभार व्यक्त केले.

हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी जिल्हा समन्वयक डॉ. एस.के.बनसोडे,प्राचार्य डॉ.बी.एस.यादव,यांचे मौलिक मार्गदर्शन लाभले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close