धार्मिक
…या ठिकाणी होणार दत्त जयंती संपन्न !

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव शहराचे उपनगर असलेल्या ओमनगर गिरमे कॉलनी येथे मित्र फाउंडेशनच्या वतीने श्री दत्त जयंती रौप्य महोत्सवी उत्सव सोहळा सालाबाद प्रमाणे याही वर्षी गुरूवार दि.०४ डिसेंबर रोजी सायं.०६ ते ०९ वाजता मोठ्या उत्साहात संपन्न होत असून याचा भाविकांनी व श्री दत्त भक्तांनी लाभ घ्यावा असे आवाहन मित्र फाउंडेशनचे अध्यक्ष वैभव गिरमे व माजी नगरसेविका दिपा गिरमे यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना केले आहे.

श्री.दत्त जयंतीच्या दिवशी दत्ताची मनोभावे नामजपादी उपासना केल्यास दत्त तत्त्वाचा अधिकाधिक लाभ मिळण्यास साहाय्य होते,अशी समाज मान्यता आहे.ब्रह्मा,विष्णू आणि महेश या त्रिदेवांचे स्थान सर्वोच्चपरी आहे.या तिन्ही देवांचे अंश म्हणजेच श्री गुरुदेव दत्त मार्गशीर्ष महिन्याच्या पौर्णिमेला दत्त व्रत व दत्त दर्शन केल्याने भक्तांच्या सर्वमनोरथ पूर्ण होतात,अशी समाज मान्यता आहे.
सदरचे सविस्तर वृत्त असे की,”मार्गशीर्ष पौर्णिमेच्या दिवशी मृग नक्षत्रावर सायंकाळी श्री भगवान दत्ताचा जन्म झाला,म्हणून त्या दिवशी दत्ताचा जन्मोत्सव सर्व दत्तक्षेत्रांत साजरा होत असतो.यंदा,आगामी गुरुवार 04 डिसेंबर २०२5 रोजी दत्त जयंती आहे.या दिवशी दत्ताची मनोभावे नामजपादी उपासना केल्यास दत्त तत्त्वाचा अधिकाधिक लाभ मिळण्यास साहाय्य होते,अशी समाज मान्यता आहे.ब्रह्मा,विष्णू आणि महेश या त्रिदेवांचे स्थान सर्वोच्चपरी आहे.या तिन्ही देवांचे अंश म्हणजेच श्री गुरुदेव दत्त मार्गशीर्ष महिन्याच्या पौर्णिमेला दत्त व्रत व दत्त दर्शन केल्याने भक्तांच्या सर्वमनोरथ पूर्ण होतात,अशी मान्यता असल्याचे सांगितले जाते.कोपरगाव आणि परिसरात दत्त भक्तांचा मोठा परिवार आहे.प्रत्येक दत्त जयंती शहरातील ओमनगर येथे मोठ्या उत्साहात संपन्न होत असते.त्यासाठी येथील गिरमे कॉलनी येथील मित्र मंडळाचे अध्यक्ष वैभव गिरमे याच पुढाकार असतो.त्यांना माजी नगरसेविका दिपा गिरमे यांचेसह यावर्षी वैभव आढाव यांचे सहकार्य लाभले असल्याची माहिती त्यांनी दिली आहे.

दरम्यान या श्री दत्त जयंती सोहळ्याचा कोपरगाव शहर आणि परिसरातील सर्व भाविक भक्तांनी महाप्रसादाचा लाभ घ्यावा असे आवाहन मित्र फाऊंडेशनचे अध्यक्ष वैभव सुर्यभान गिरमे तसेच श्री गणेश दत्त मंदिर व्यवस्थापन समिती,ओमनगर महिला मंडळ,ओमनगर आदींनी केले आहे.



