जाहिरात-9423439946
गुन्हे विषयक

कोपरगावात एकाचे निधन,पोलिसांत अकस्मात नोंद

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव तालुक्यातील टाकळी ग्रामपंचायत हद्दीतील रहिवासी शेतमजूर असलेला इसम अंकुश हैबती मोरे (वय-७०) याचे कोपरगाव येथे साईबाबा कॉर्नर येथे अज्ञात कारणाने निधन झाले असून त्यास कोपरगाव येथील ग्रामीण रूग्णालयात उपचारार्थ भरती केले असता तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यानी त्यास मृत घोषित केले आहे.

टाकळी येथील शेतमजूर अंकुश मोरे याचा मृत्यू हा उष्माघाताने झाला असावा असा अंदाज व्यक्त होत आहे.त्यास काही नागरिकांनी उपचारार्थ कोपरगाव ग्रामीण रुग्णालायत भरती केले असता तेथील उपचार करणारे वैद्यकीय अधिकारी डॉ.अमित नाईकवाडी यांनी त्यास मृत घोषित केले आहे.त्याच्या पश्चात पत्नी,चार मुली असा परिवार आहे.त्याच्या निधनाने टाकळी आणि परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

सदर इसम हा टाकळी हद्दीतील कोल्हे वस्ती येथे शेतमजुरी करून आपला व आपल्या कुटुंबाचा चरितार्थ चालवत होता.मात्र काही कामानिमित्त तो कोपरगाव शहरात आला होता.मात्र काही अज्ञात कारणाने त्याचा मृत्यू झाला आहे.त्याचा मृत्यू हा उष्माघाताने झाला असावा असा अंदाज व्यक्त होत आहे.त्यास काही नागरिकांनी उपचारार्थ कोपरगाव ग्रामीण रुग्णालायत भरती केले असता तेथील उपचार करणारे वैद्यकीय अधिकारी डॉ.अमित नाईकवाडी यांनी त्यास मृत घोषित केले आहे.त्याच्या पश्चात पत्नी,चार मुली असा परिवार आहे.त्याच्या निधनाने टाकळी आणि परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

दरम्यान वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याचा अहवाल कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात दाखल केला असता तेथे त्याच्या अकस्मात मृत्यू दप्तरात नोंद क्रं.३२/२०२३ सी.आर.पी.सी.१७४ प्रमाणे नोंद केली आहे.पुढील तपास पोलीस निरीक्षक रामराव ढिकले यांचे मार्गदर्शनाखाली पो.ना.बी.एस.कोरेकर हे करीत आहेत.

जाहिरात-9423439946

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close