गुन्हे विषयक
किराणा दुकानास आग,लाखो रुपयांचा ऐवज खाक,कोपरगावात गुन्हा
न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव तालुक्यातील रवंदे ग्रामपंचायत हद्दीत रहिवासी असलेल्या फिर्यादीच्या बहिणीची छेड काढल्या प्रकरणी त्याचा जाब विचारण्यास गेलेल्या भावाला व त्याच्या मित्रास आरोपी अविनाश कंक्राळे व सुभाष कदम या दोघांनी मारहाण करून जीवे मारण्याचा प्रयत्न केला असल्याचा पार्श्वभूमीवर तेथील दुकानास आग लागल्याने तेथे उलट-सुलट चर्चेला उधाण आले आहे.या प्रकरणी सुरेखा विठ्ठल कंक्राळे या महिलेने कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात दोन संशयिता विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
छायाचित्रे संकल्पित.
दरम्यान या रवंदे येथील आगीत फ्रीज,झेरॉक्स मशीन,तसेच कागदपत्रे उधारीच्या पैशाची वही,फटाके,किराणा,स्टेशनरी वैगरे लाखो रुपयांच्या चीजवस्तू जळून खाक झाल्या आहेत.यात फिर्यादी महिलेने यातील संशियत आरोपी जयदीप शंकर कदम व जयवंत रामराव कदम व इतर लोक जमले होते.त्याचा राग मनात धरला असावा असा संशय आपल्या फिर्यादीत महिलेने व्यक्त केला आहे.
सदरचे सविस्तर वृत्त असे की,फिर्यादी तरुण व आरोपी हे एकाच गावातील रहिवासी आहेत.फिर्यादीची बहीण हि गुरुवार दि.०४ मे रोजी रात्री ०९ वाजेच्या सुमारास दुकानात काही चीजवस्तू आणण्यासाठी गेली असता त्या ठिकाणी असलेले आरोपी अविनाश कंक्राळे व त्याचा सहकारी सुभाष कदम हे सदर दुकानासमोर बसलेले होते.त्यावेळी आरोपीनी फिर्यादीच्या बहिणीची छेड काढली असल्याचा आरोप केला होता व त्या वरून दोन गटात मारहाण झाली होती.त्याबाबत गुन्हा कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला होता.व त्याबाबत फिर्यादी इसम व त्याचे नातेवाईक हे कोपरगाव येथील न्यायालयात हजर होण्यासाठी गेले असता व परत आले असता त्यांचे दुकान सुस्थितीत होते असा फिर्यादी महिला व तिच्या घरातील व्यक्तींनी दावा केला आहे.
मात्र त्याच्या दुसऱ्या दिवशी दि.०५ मे रोजी पहाटे ०५ वाजेच्या सुमारास कोणातरी अज्ञात व्यक्तीने शिवकृपा किराणा व जनरल स्टोअर्स या दुकानास अज्ञात साहित्याने आग लावली होती.त्याबाबत फिर्यादी महिलेचे पती विठ्ठल कंक्राळे यांना मोबाईल क्रं.८४५९८६५४५८ या फोन वरून या आगीबाबत खबर दिली होती.व तुमच्या दुकानातून आग व धूर निघत असल्याचे सांगितले होते.त्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन पाहिले असता खबर बरोबर निघाली होती.दरम्यान त्यांनी अग्निशामक बंब यांना पाचारण करून सदर आग विझविण्यासाठी प्रयत्न करून ती अटोक्यात आणली आहे.
दरम्यान या आगीत फ्रीज,झेरॉक्स मशीन,तसेच कागदपत्रे उधारीच्या पैशाची वही,फटाके,किराणा,स्टेशनरी वैगरे लाखो रुपयांच्या चीजवस्तू जळून खाक झाल्या आहेत.यात फिर्यादी महिलेने यातील संशियत आरोपी जयदीप शंकर कदम व जयवंत रामराव कदम व इतर लोक जमले होते.त्याचा राग मनात धरला असावा असा संशय आपल्या फिर्यादीत व्यक्त केला आहे.दरम्यान याबाबत पोलीस अधिकारी यांनी घटनास्थळी धाव घेऊन खातरजमा केली आहे.
त्यावरून कोपरगाव तालुका पोलिसांनी आपल्या दप्तरी गुन्हा क्रं.२३८/२०२३ भा.द.वि.कलम.४३५,४२७,प्रमाणे संशियत आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.पुढील तपास पोलीस निरीक्षक वासुदेव देसले यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस हे.कॉ.संदीप बोटे हे करीत आहेत.