पर्यटन व तीर्थक्षेत्र
…या मंदिर परिसराच्या बाहेर पादत्राणे बाहेर ठेवा आदेश-मुख्य कार्यकारी अधिकारी
न्यूजसेवा
शिर्डी-(प्रतिनिधी)
शिर्डीतील साई संस्थानच्या सर्व प्रशासकीय अधिकारी,अधिक्षक विभाग प्रमुख,कर्मचारी यांनी श्रींचे समाधी मंदिर व मंदिर परिसरात प्रवेश करतांना आपले पादत्राणे प्रत्येक प्रवेशद्वाराबाहेर पादत्राणे गृहावर (चप्पल स्टॅन्ड) ठेवुनच प्रवेश करावा अशा सुचना संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी १२ मे रोजीचे परिपत्रकाद्वारे दिल्या आहेत.
संरक्षण विभागाने श्री साईभक्त (भाविक) व सर्व ग्रामस्थ यांना श्रींचे समाधी मंदिर व मंदिर परिसरात प्रवेश देतांना पादत्राणे प्रवेशद्वाराबाहेर पादत्राणे गृहावर (चप्पल स्टॅन्ड) ठेवुनच प्रवेश दयावा असे परिपत्रकात नमुद आहे. तसेच दर्शनरांगेत भाविकांना पाय धुण्याची व गंध लावण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे.
तरी सर्व ग्रामस्थ व साईभक्तांनीही मंदिर परिसरामध्ये प्रवेश करतांना आपले पादत्राणे हे प्रवेशद्वाराबाहेर उपलब्ध करून देणेत आलेल्या पादत्राणे गृहावर (चप्पल स्टॅन्ड) ठेवुनच मंदिर परिसरात प्रवेश करावा असे अवाहन संस्थानचे वतीने मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी केले आहे.