विशेष दिन
भक्तांच्या रक्षणार्थ भगवान नृहसिंह परमात्म्याने अवतार घेतला-…या महाराजांचे प्रतिपादन

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
पृथ्वीवरील दृष्ट प्रवृत्तीचा संहार आणि भक्तांच्या रक्षणार्थ भगवान नृहसिंह परमात्म्याने अवतार घेतल्याचे प्रतिपादन साई कथाकार ह.भ.प.बाळकृष्ण महाराज सुरासे यांनी नुकतेच कान्हेगाव येथे एका कार्यक्रमात बोलताना केले आहे.

नृसिंह अवतार हा भगवान विष्णूच्या दहा अवतारांपैकी एक मानला जातो.भगवान नृसिंह हे सामर्थ्य आणि पराक्रमाचे देव आहेत आणि ते शत्रूंचा नाश करणारे म्हणून ओळखले जातात.पौराणिक कथेनुसार या दिवशी भगवान विष्णुंनी भक्त प्रल्हाद यांच्या रक्षणासाठी नृसिंह अवताराने प्रकट होत राक्षसांचा राजा हिरण्यकशपूचा वध केला होता अशी मान्यता आहे.
नृसिंह अवतार हा भगवान विष्णूच्या दहा अवतारांपैकी एक मानला जातो.भगवान नृसिंह हे सामर्थ्य आणि पराक्रमाचे देव आहेत आणि ते शत्रूंचा नाश करणारे म्हणून ओळखले जातात.पौराणिक कथेनुसार या दिवशी भगवान विष्णुंनी भक्त प्रल्हाद यांच्या रक्षणासाठी नृसिंह अवताराने प्रकट होत राक्षसांचा राजा हिरण्यकशपूचा वध केला होता अशी मान्यता आहे.नृसिंह यांचे दुर्मिळ मंदिर कोपरगाव तालुक्यातील कान्हेगाव येथे असून त्या ठिकाणी नुकतीच नृसिंह जयंती मोठ्या उत्साहात संपन्न झाली आहे.त्यावेळी ते बोलत होते.
त्यावेळी पुढे बोलताना ते म्हणाले की,”ज्या ज्या वेळी मानवी जीवन धोक्यात येते त्या त्या वेळी भगवंत अवतार घेऊन भक्तांचे संरक्षण करत असतात.त्या भगवंताचे दर्शन घेऊन भक्तांचा विश्वास दुनावत असल्याचे त्यांनी सांगितले आहे.नृसिंह भगवंताच्या भक्तीने मनुष्यास विशेष लाभ होत असतो असे शेवटी सांगितले आहे.
दरम्यान कान्हेगाव येथील नृसिंह मंदिरात दरवर्षी मोठ्या प्रमाणावर उत्सव साजरा होत असतो त्यात जप अनुष्ठान,नाम सप्ताह,नृसिंह पुराण,किर्तन,प्रवचने आदी कार्यक्रमाची रेलचेल असते.त्यावेळी उपस्थित भाविकांना महा प्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.त्याचा कान्हेगाव,वारी,शिंगवे,सडे आदी परिसरातील भाविकांनी लाभ घेतला असल्याची माहिती आयोजकांनी दिली आहे.