जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
गुन्हे विषयक

ऍड.काळेंच्या गाडीवर हल्ला,गुन्हा दाखल

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा
कोपरगाव-(नानासाहेब जवरे)

उत्तर नगर जिल्ह्यातील राजकीयदृष्ट्या महत्वाच्या समजल्या जाणाऱ्या श्रीरामपूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत सत्ताधाऱ्यांच्या पायाखालची वाळू अखेर सरकली असल्याचे समजले जात असून शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष ऍड.अजित काळे यांच्या मुर्सिडीज कारवर (क्रं.एम.एच.२० सी.यु.३००४) मध्यरात्री १२.३०च्या सुमारास अज्ञात आरोपीने दगड मारून नुकसान केले असल्याची धक्कादायक माहिती हाती आली आहे.त्यामुळे सभासदांत मोठ्या प्रमाणावर नाराजी पसरली आहे.या घटनेचे तीव्र पडसाद उमटण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

“शनिवार दि.२९ एप्रिल रोजीच्या रात्री १०.३० ते ११.३० वाजेच्या सुमारास आपण व आपले सहकारी हे जेवणासाठी समोरच्या हॉटेल मध्ये गेलो असताना त्यांच्या वरील क्रमांकाच्या मर्सिडीज कारवर अज्ञात आरोपीने दगडाने भ्याड हल्ला करून नुकसान केले आहे.मात्र सुदैवाने गाडीत कोणी नव्हते.त्यामुळे पुढील अनर्थ टळला आहे”-अड्.अजित काळे,प्रदेश उपाध्यक्ष,शेतकरी संघटना.

अड्.अजित काळे यांच्या गाडीवर हल्ला झाला ती हल्ला झालेली गाडी छायाचित्रात दिसत आहे.

ग्रामिण भागातील राजकारणात व अर्थकारणात कृषी उत्पन्न बाजार समित्या खूप महत्त्वाच्या मानल्या जातात.राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या बऱ्याच निवडणुका पार पडल्या असून कोपरगाव,श्रीरामपूर,राहाता,उर्वरित कृषी उत्पन्न बाजार समित्यांसाठी ३० एप्रिल रोजी म्हणजेच आज निवडणूक संपन्न होत आहे.त्यामुळे या निवडणुकांकडे राजकीय निरीक्षक व नागरिकांचे लक्ष लागून आहे.
राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये २५ पैकी १८ बाजार समित्यांचे नेतृत्व महाविकास आघाडीकडे असून ०५ बाजार समित्या भाजपच्या ताब्यात आल्या आहे.तर नगर जिल्ह्यातील राहुरी येथील बाजार समिती माजी खा.प्रसाद तनपुरे व आ.प्राजक्त तनपुरे यांनी राखली आहे.तेथे महसुलमंत्री राधाकृष्ण विखे आणि माजी मंत्री शिवाजी कर्डीले यांना मतदारांनी धूळ चारली आहे.श्रीरामपूर,संगमनेर व कोपरगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत वेगळी स्थिती रहाणार नाही अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे.त्यामुळे सत्तेसाठी एकत्र आलेल्यांचे धाबे दणाणले आहे.

श्रीरामपूर तालुक्यात माजी आ.भानुदास मुरकुटे यांच्या अशोक सहकारी सहकारी साखर करण्यात गतवर्षी संपन्न झालेल्या निवडणुकीत शेतकरी संघटनेने प्रदेश उपाध्यक्ष अड्.अजित काळे यांच्या नेतृत्वाखाली मोठी बिकट केली होती.त्या निवडणुकीचे पडसाद बाजार समितीच्या निवडणुकीत उमटण्याची शक्यता वर्तविण्यात येत होती.त्यांमुळे इच्छा नसताना महसूल मंत्री राधाकृष्ण विखे व माजी स्व.आ.जयंत ससाणे यांचे पुत्र करण ससाणे यांच्या गळ्यात हात घालावा लागला आहे.यातच सर्व काही आले.श्रीरामपूर तालुक्यात शेतकरी संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष अड्.अजित काळे यांनी कॉंग्रेसचे आ.लहू कानडे,राष्ट्रवादीचे सरचिटणीस अविनाश आदिक आदींना सोबत घेतले असून गावंगाव पिंजून काढले आहे.परिणामस्वरूप सत्ताधाऱ्यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे.त्यामुळे या आततायीपणात एखादी घटना घडणार याबाबत अनेकांच्या मनात संशय होता तो या घटनेने खरा ठरला आहे.मात्र याची उलटी प्रतिक्रिया सभासदांत उमटण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

दरम्यान या घटनेचा शेतकरी संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष ऍड.अजित काळे यांनी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात धाव घेऊन उशिरा गुन्हा दाखल केला असल्याची माहिती शरद आसने यांनी आमच्या प्रतिनिधीस दिली आहे.त्यात अड्.अजित काळे यांनी म्हटले आहे की,”रात्री १०.३० ते ११.३० वाजेच्या सुमारास आपण आपले सहकारी हे जेवणासाठी समोरच्या हॉटेल मध्ये गेले असताना त्यांच्या वरील क्रमांकाच्या मर्सिडीज कारवर अज्ञात आरोपीने दगडाने हल्ला करून नुकसान केले आहे.मात्र सुदैवाने गाडीत कोणी नव्हते.

या भ्याड हल्ल्याचा शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रघुनाथ दादा पाटील,कार्याध्यक्ष कालिदास आपेट,क्रांतिसिंह नाना पाटील ब्रिग्रेडचे प्रदेशाध्यक्ष शिवाजीराव नांदखिले,श्रीरामपूरचे आ.लहू कानडे,राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस अविनाश आदिक,निळवंडे कालवा कृती समितीचे संस्थापक नानासाहेब जवरे,अध्यक्ष रुपेंद्र काले,शेतकरी संघटनेचे जिल्हा अध्यक्ष अनिल औताडे,सुरेश ताके,युवराज जगताप,कालवा समितीचे गंगाधर रहाणे,संजय गुंजाळ,सोन्याबापू उऱ्हे सर,गोरक्षनाथ शिंदे,उत्तमराव जोंधळे,दत्तात्रय थोरात,विजय थोरात आदींनी निषेध व्यक्त केला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close