निधन वार्ता
शांताबाई गव्हाणे यांचे निधन

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव तालुक्यातील जवळके गावचे माजी सरपंच स्व.चांगदेव मुरलीधर थोरात यांच्या अंजनापूर येथील रहिवासी भगिनी शांताबाई रावसाहेब गव्हाणे (वय-८२)यांचे आज दुपारी वाजता निधन झाले आहे.त्यांच्या पश्चात दोन मुले,मुली असा परिवार आहे.त्यांच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

स्व.शांताबाई गव्हाणे या अत्यंत धार्मिक व मनमिळाऊ स्वभावाच्या म्हणून अंजनापूर व परिसरात परिचित होत्या.
त्यांच्यावर अंजनापूर येथे सायंकाळी ५.३० वाजता शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले आहे.
त्यांच्या निधनाबद्दल अंजनापूर,जवळके,रांजणगाव देशमुख परिसरात शोककळा पसरली आहे.त्या निळवंडे कालवा कृती समितीचे कार्यकर्ते दत्तात्रय थोरात व रावसाहेब सुखदेव थोरात यांच्या आत्या होत्या तर अभियांत्रिकी महाविद्यालयाचे
प्राचार्य बाळासाहेब गव्हाणे व जेष्ठ कार्यकर्ते सोपान गव्हाणे यांच्या मातोश्री होत्या.
त्यांच्या निधनाबद्दल निळवंडे कालवा कृती समितीचे संस्थापक नानासाहेब जवरे,अध्यक्ष रुपेंद्र काले,कार्याध्यक्ष गंगाधर रहाणे,संघटक नानासाहेब गाढवे,बाबासाहेब गव्हाणे,भाऊसाहेब गव्हाणे,सचिव कैलास गव्हाणे आदींनी दुःख व्यक्त केले आहे.