निधन वार्ता
गोरख पवार यांचे निधन

न्यूजसेवा
संवत्सर-(वार्ताहर)
कोपरगाव तालुक्यातील संवत्सर येथील लक्ष्मणवाडी परिसरातील युवक कार्यकर्ते गोरख शिवराम पवार (वय-४२) यांचे हृदयविकाराने नुकतेच निधन झाले.वणी ( दिंडोरी ) येथे सप्तशृंगी गडाच्या पायथ्याशी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले आहे.संवत्सर परिसरातील मोठा जनसमुदाय अंत्यविधीसाठी वणी येथे उपस्थित होता.
कै.गोरख पवार हे लक्ष्मणवाडी परिसरातील शेती महामंडळाच्या वसाहतीमध्ये गेल्या अनेक वर्षापासून वास्तव्यास होते.त्याचे सर्वच नातेवाईक वणी ( दिंडोरी) येथे वास्तव्यास आहेत.मनमिळाऊ स्वभाव व सतत मदतीला धाऊन जाणारा कार्यकर्ता म्हणून कै.पवार हे संवत्सर परिसरात परिचित होते.
त्यांच्या पश्चात पत्नी,भाऊ,पुतणे असा परिवार आहे.त्यांच्या निधनामुळे परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे. |