गुन्हे विषयक
दोन गटात हाणामारी,कोपरगावात चार जणांवर गुन्हा

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव शहर पोलिस ठाण्याच्या समोरच नुकताच दोन गटातील तरुणांनी राडा केला असून आपापसात शिवीगाळ करून झुंज करताना आढळून आल्याने दोन्ही गटाच्या यादव खंडु पारधे,गोरख खंडू यादव,योगेश बन्सी मोरे आणि रघुनाथ शिवराम मोरे आदी चार जणांविरुद्ध कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केल्याने कोपरगाव शहरात खळबळ उडाली आहे.
कोपरगाव शहरात पोलीस अधिकारी बदलूनही चोऱ्या आणि चोरट्यांची आणि बेताल तरुणांची दांडगाई कमी होताना दिसत नाही.नूकतीच अशीच घटना उघड झाली आहे.दि.शुक्रवार दि.३१ मार्च रोजी सायंकाळी ०५ वाजेच्या सुमारास शहर पोलीस ठाण्याच्या सुमारास तरुणांचे एक टोळके येऊन उभे राहिले होते.व त्यांच्यात काही कारणावरून बेबनाव निर्मांण होऊन ते ऐकमेकास जोरजोराने शिवीगाळ करून आपापसात मारहाण करीत होते.व थेट पोलिसांसमोरच झुंज करताना व सामाजिक शांतता भंग करताना दिसून आले आहे.
कोपरगाव शहरात नुकतेच पोलीस निरीक्षक रामराव ढिकले यांचे आगमन झाले आहे.या पूर्वी तालुका पोलीस ठाण्यात बदली झालेले पोलीस निरीक्षक वासुदेव देसले यांचेकडे कार्यभार होता.त्याच्या काळातही गुन्ह्यात अनुक्रमे वाढ होत होती मात्र बरेच गुन्हे नोंदवले जात नव्हते.नवीन अधिकारी आल्याने यात काही बदल होईल अशी अशा असताना त्यात कोणताही बदल होतांना दिसत नाही.साधारणपणे नवीन अधिकारी आल्यावर किमान सुरुवातीला आपला प्रभाव दाखवण्यासाठी तरी काही तरी प्रयत्न करताना दिसत असतो हे सार्वत्रिक चित्र दिसून येते.मात्र कोपरगाव शहर त्याला अपवाद होताना दिसत आहे.अधिकारी बदलूनही चोऱ्या आणि चोरट्यांची आणि बेताल तरुणांची दांडगाई कमी होताना दिसत नाही.नूकतीच अशीच घटना उघड झाली आहे.दि.शुक्रवार दि.३१ मार्च रोजी सायंकाळी ०५ वाजेच्या सुमारास शहर पोलीस ठाण्याच्या सुमारास तरुणांचे एक टोळके येऊन उभे राहिले होते.व त्यांच्यात काही कारणावरून बेबनाव निर्मांण झाला असल्याचे दिसत होते.त्यातून ते ऐकमेकास जोरजोराने शिवीगाळ करून आपापसात मारहाण करीत होते.व थेट पोलिसांसमोरच झुंज करताना व सामाजिक शांतता भंग करताना दिसून आले आहे.
दरम्यान कोपरगाव शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रामराव ढिकले यांनी व सहकाऱ्यांनी आदींनी घटनास्थळी भेट देऊन या प्रकरणी कारवाई केली आहे.
या प्रकरणी फिर्यादी पो.कॉ.संभाजी शिंदे (वय-३६) यांच्या फिर्यादीवरून कोपरगाव शहर पोलिस ठाण्याच्या दप्तरी नोंद केली क्रं.१५१/२०२३ भा.द.वि. कायदा कलम-१६० अन्वये आज नोंद केली आहे.पुढील तपास पोलिस निरीक्षक ढिकले यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस पोलीस नाईक बी.एस.कोरेकर हे करीत आहेत.