धार्मिक
शिर्डीत श्री रामनवमी उत्सवाची सांगता

न्यूजसेवा
शिर्डी -(प्रतिनिधी)
शिर्डी येथील श्री साईबाबा संस्थान विश्वस्तव्यवस्थेच्या वतीने दिनांक २९ मार्च पासून सुरु असलेल्या श्री रामनवमी उत्सवाची सांगता आज ह.भ.प.विक्रम महाराज नांदेडकर यांच्या काल्याच्या कीर्तनानंतर श्री साईबाबा समाधी मंदिरात दहीहंडी फोडून झाली मोठ्याउत्साहात झाली आहे.
शिर्डीत साई दरबारात सायंकाळी ०६.३० वाजता श्रींची धुपारती. रात्रौ ०७.१५ ते ०९.३० यावेळेत श्रीमती सुनिता कोटारी,तिरुपती यांचा शास्त्रीय नृत्य कोलाटन्स व भजन संध्या कार्यक्रम श्री साईबाबा समाधी मंदिर शताब्दी मंडपातील स्टेजवर संपन्न झाला.या कार्यक्रमास श्रोत्यांनी उत्स्पुर्त प्रतिसाद दिला.संस्थानच्या वतीने या कलाकारांचा सत्कार करण्यात आला.तर रात्रौ १०.०० वाजता शेजारती झाली आहे.
आज उत्सवाच्या सांगता दिनी पहाटे ०५.०५ वाजता श्रींचे मंगलस्नान व शिर्डी माझे पंढरपूर ही आरती झाली. सकाळी ०७ वाजता संस्थानचे तदर्थ समितीचे सदस्य तथा जिल्हाधिकारी सिध्दाराम सालीमठ व त्यांच्या सुविद्य पत्नी सौ.मिनाक्षी सालीमठ यांच्या हस्ते गुरुस्थान मंदिरात रुद्राभिषेक पूजा करण्यात आली. तर संस्थानचे प्र.मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल जाधव व त्यांची पत्नी कावेरी जाधव यांच्या हस्ते समाधी मंदिरात श्रींची पाद्यपुजा करण्यात आली. यावेळी मंदिर प्रमुख रमेश चौधरी व मंदिर पुजारी उपस्थित होते. सकाळी १०.०० वाजता ह.भ.प.विक्रम महाराज नांदेडकर यांचे गोपाळकाला कीर्तनानंतर श्री साईबाबा समाधी मंदिरात दहीहंडी फोडण्यात आली.
सदर प्रसंगी संस्थानचे प्र.मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल जाधव,मुख्य लेखाधिकारी श्रीमती मंगला वराडे, प्रशासकीय अधिकारी डॉ.आकाश किसवे,लेखाधिकारी कैलास खराडे,उपकार्यकारी अभियंता बी.डी.दाभाडे, संरक्षण अधिकारी आण्णासाहेब परदेशी,मंदिर प्रमुख रमेश चौधरी,मंदिर पुजारी,कर्मचारी,साईभक्त व ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थित होते.ह.भ.प.विक्रम महाराज नांदेडकर यांचा संस्थानच्या वतीने प्र.मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल जाधव यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला आहे.त्यानंतर दुपारी १२.१० वाजता श्रींची माध्यान्ह आरती झाली.
सायंकाळी ०६.३० वाजता श्रींची धुपारती. रात्रौ ०७.१५ ते ०९.३० यावेळेत श्रीमती सुनिता कोटारी,तिरुपती यांचा शास्त्रीय नृत्य कोलाटन्स व भजन संध्या कार्यक्रम श्री साईबाबा समाधी मंदिर शताब्दी मंडपातील स्टेजवर संपन्न झाला.या कार्यक्रमास श्रोत्यांनी उत्स्पुर्त प्रतिसाद दिला.संस्थानच्या वतीने या कलाकारांचा सत्कार करण्यात आला.तर रात्रौ १०.०० वाजता शेजारती झाली आहे.
श्री रामनवमी उत्सव यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी संस्थानचे तदर्थ समितीचे अध्यक्ष तथा प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश सुधाकर यार्लगड्डा,समिती सदस्य तथा जिल्हाधिकारी सिध्दाराम सालीमठ व प्र.मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली संस्थानच्या मुख्यलेखाधिकारी श्रीमती मंगला वराडे,प्रशासकीय अधिकारी सर्वश्री डॉ.आकाश किसवे,दिलीप उगले,संजय जोरी,उपकार्यकारी अभियंता बी.डी.दाभाडे,संरक्षण अधिकारी आण्णासाहेब परदेशी, सर्व विभागांचे विभाग प्रमुख व सर्व कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले आहे.