कोपरगाव तालुका
गाड्या काढण्याच्या कारणावरून तुंबळ हाणामारी,तीन जखमी

संपादक-नानासाहेब जवरे
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव तालुक्यातील मढी ग्रामपंच्यात हद्दीत मढी-पाथरे शिव रस्त्यावर गाड्या काढण्याच्या कारणावरून दोन गटात लाठ्या-काठ्यांनी झालेल्या हाणामारीत नारायण रामकृष्ण आभाळे यांच्यासह गंगुबाई रामकृष्ण आभाळे, रामकृष्ण कचरु आभाळे हे तीन जण जखमी झाले असून आरोपी नानासाहेब सूर्यभान आभाळे, अण्णासाहेब सूर्यभान आभाळे, गणपत सूर्यभान आभाळे,संकेत गणपत आभाळे, किरण नानासाहेब आभाळे,अतुल अण्णासाहेब आभाळे,लिलाबाई गणपत आभाळे,या सर्वांवर कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात फिर्यादी नारायण आभाळे यांनी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदरचे सवित्तर वृत्त असे कि,फिर्यादी नारायण आभाळे व आरोपी नानासाहेब आभाळे यांच्यात जाण्या येण्याच्या रस्त्यावरून गेले काही दिवसापासून वाद आहेत.गुरुवार दि.६ फेब्रुवारी रोजी सकाळी ७ ते साडेसात वाजेच्या सुमारास मढी -पाथरे शिव रस्त्यावर गाड्या लावल्या होत्या त्या काढून घेण्यास आरोपी नानासाहेब आभाळे यांनी काढून घेण्यास सांगितल्या असल्याचा राग येऊन त्याचे पर्यावसान हाणामारीत झाले आहे. या दोन्ही गटात आधी किरकोळ असणाऱ्या भांडणाचे मोठ्या भांडणात रूपांतर होऊन आरोपी नानासाहेब आभाळे व त्यांचे घरातील अन्य सदस्य अण्णासाहेब आभाळे गणपत आभाळे, संकेत आभाळे, किरण आभाळे, अतुल आभाळे, लिलाबाई आभाळे यांनी थेट लाठ्यालाठ्यांचा वापर करून फिर्यादी व त्यांच्या अन्य सदस्यांवर काठ्यांनी हल्ला चढवला त्यात फिर्यादी नारायण आभाळे व गंगुबाई आभाळे, रामकृष्ण आभाळे हे जखमी झाले आहेत.
या प्रकरणी कोपरगाव तालुका पोलिसानी वरील आरोपीविरुद्ध गु.र.नं. ३४/२०२० भा.द.वि.कलम ३२४,३२३,१४३,१४७,१४९,४२७,५०४,५०६ यान्वये गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक अनिल कटके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक बी.एम.ढाका हे करीत आहेत.