जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
गुन्हे विषयक

दोन इंधनचोर पकडले,कोपरगाव पोलिसांची कारवाई

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव तालुक्यातील कोळपेवाडी हद्दीतील सिद्धेश्वर ग्रामीण पतसंस्थेच्या समोर उभी करून ठेवलेली शाळांच्या बस मधील डिझल अज्ञातच चोरट्यांनी चोरून नेले होते.त्याबाबत मिळालेल्या गुप्त खबरीनुसार कोपरगाव तालुका पोलिसांनी केलेल्या कारवाईत अमोल अविनाश कुंदे (वय-१९) रा.एकरुखे व रवींद्र उर्फ भगवान भिकाजी भातकुटे (वय-३५) रा.राहाता या दोघाना जेरबंद केले आहे.व त्यांच्या ताब्यातील ०९ हजार ७०६ रुपये किमतीचे १०५ लिटर डिझल जप्त केले आहे.पोलिसांच्या या कारवाईचे कौतुक होत आहे.

दि.२७ मार्च रोजी कोळपेवाडी येथे उभी करून ठवलेली शाळेची बस चालक चांगदेव साहेबराव कदम (वय-४५) यांनी उभी करून ठेवली असता अज्ञात चोरट्यांनी त्या बस मधील सुमारे ०९ हजार ७०६ रुपयांचे १०५ लिटर डिझल अज्ञात चोरट्यांनी चोरून नेले होते.त्याबाबत त्यांनी कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात सदर गुन्हा भा.द.वि.कलम ३७९,४११,३४ अन्वये दाखल केला होंता.व त्यातील आरोपींचा शोध सुरु केला होता त्यात हे यश आले आहे.मात्र सदर गुन्हा मात्र माध्यमापासून दूर ठेवला होता.

कोपरगाव शहर आणि तालुक्यात दुचाकी आणि चार चाकी वाहन चोरीच्या व भुरट्या चोऱ्यांच्या घटना दिवसेंदिवस वाढत असून त्या कमी की काय इंधन चोऱ्याही लक्षणीयरित्या वाढल्या आहेत.त्यामुळे कोपरगाव तालुका आणि शहर पोलिसांपुढे या चोरट्याना शोधण्याचे आव्हान निर्माण झाले आहे.त्यातच दि.२७ मार्च रोजी कोळपेवाडी येथे उभी करून ठवलेली शाळेची बस (क्रं.एम.एच.१७ बी.वाय.०३२८) हि चालक चांगदेव साहेबराव कदम (वय-४५)यांनी उभी करून ठेवली असता अज्ञात चोरट्यांनी त्या बस मधील सुमारे ०९ हजार ७०६ रुपयांचे १०५ लिटर डिझल अज्ञात चोरट्यांनी चोरून नेले होते.त्याबाबत त्यांनी कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा क्रं.१६२/२०२३ भा.द.वि.कलम ३७९,४११,३४ अन्वये दाखल केला होंता.

त्या बाबत कोपरगाव तालुका पोलीस तपास करत असताना त्यांना गुप्त बातमीदारा मार्फत खबर लागली की,”सदरचा गुन्हा हा राहाता तालुक्यातील आरोपी अमोल कुंदे यांने केला आहे.त्यानुसार तालुका पोलिसांनी कारवाई केली असता त्यास ताब्यात घेऊन त्यास पोलिसी हिसका दाखवला असता त्याने सदरचा माल हा राहाता येथील भातकुटे वस्तीवर आरोपी रवींद्र भातकुटे यास विकले आहे.

त्या प्रमाणे पोलीस निरीक्षक वासुदेव देसले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक तुषार धाकराव,पो.ना.विलास कोकाटे,किसन सानप,कृष्णा कुऱ्हे,शिंदे,पो.कॉ.रशीद शेख,इरफान शेख आदींनी सापळा लावला होता.त्यानां पोलिसांनी ताब्यात घेतले.त्यांना ताब्यात घेऊन विशेष प्रसाद दिला असता त्यांनी ०९ हजार ७०६ रुपयांचे चोरलेले तीन निळ्या रंगातील ड्रम मधील १०५ लिटर इंधन गुपचूप काढून दिले आहे.या प्रकरणी कोपरगाव तालुका पोलिस अधिकारी आणि पोलिसांचे तालुक्यात कौतुक होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close