जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
गुन्हे विषयक

कंटेनर-दुचाकी अपघात,एक ठार,एक जखमी,कोपरगाव तालुक्यातील घटना

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव तालुक्यातील अ.नगर-मनमाड राष्ट्रीय महामार्गावर दुचाकीवरून जात आपल्या घरी विद्युत मोटार व पाईप आदी सामान घेऊन असताना मागून येणाऱ्या कंटेनरने जोराची धडक दिली त्यात दुचाकीवर बसलेले फिर्यादी शिक्षकांचे वडील बाबूराव तान्हाजी साळुंके (वय-६३) हे गंभीररीत्या जखमी होऊन त्यांना कोपरगाव ग्रामीण रुग्णालयात उपचारार्थ भरती केले असता त्यात त्यांचे निधन झाले असल्याची फिर्याद कोकमठाण येथील शिक्षक सुनील साळुंके (वय-३६) यांनी कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात दाखल केल्याने खळबळ उडाली आहे.

संकल्पित छायाचित्र.

फिर्यादी सुनींल सालुंके व त्याचे वडील बाबुराव साळुंके असे दोघे कोपरगाव येथे पाण्याची विद्युत मोटार व तिचा पाईप घेऊन आपल्या घरी जात असताना ‘साई सृष्टी लॉन्स’ समोर त्यांच्या पाठीमागून एक कंटेनर (क्रं.एम.एच.१२ बी.एक्स.८९७७) हा याने त्यांना जोराची धडक दिली असून त्यात फिर्यादीचे वडील बाबुराव साळुंके हे रस्त्यावर जोराने पडून त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत होऊन उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले आहे.तर फिर्यादी हे किरकोळ जखमी झाले आहे.

सदरचे सविस्तर वृत्त असे की,वर्तमानात सावळीविहिर-इंदोर हा राज्य मार्ग काही दिवसापूर्वी राष्ट्रीय मार्गात रूपांतरित झाला आहे.त्याचे काम वेगात चालू आहे.त्यासाठी ठिकठिकाणी पुलाचे काम सुरु असल्याने सदर रस्ता एकल करण्यात आला आहे.परिणामस्वरूप सदर ठिकाणी वाहनाची गर्दी आढळून येत आहे.त्यामुळे सदर ठिकाणी बऱ्याच वेळा वाहनांची गर्दी असल्याने वळण रस्ता वाहन चालकांच्या लक्षात येत नाही परिणामी अपघात होत असल्याचे आढळून आले आहे.अशीच घटना दि.०३ फेब्रुवारी रोजी दुपारी ०१ वाजेच्या सुमारास घडली आहे.

फिर्यादी शिक्षक सुनील साळुंके हे समता इंटरनॅशनल स्कूल येथे शिक्षकांची नोकरी करत असून त्यांचे मूळ गाव कोकमठाण आहे.त्यांचे मालकीची वडिलांच्या नावावर असलेली टि.व्ही.एस.कंपनीची एक्स.एल.१०० या मॉडेलची दुचाकी (क्रं.एम.एच.१७ सी.डब्ल्यू.२६७२) असून त्यावर फिर्यादी सुनींल सालुंके व त्याचे वडील बाबुराव साळुंके असे दोघे कोपरगाव येथे पाण्याची विद्युत मोटार व तिचा पाईप घेऊन आपल्या घरी जात असताना ‘साई सृष्टी लॉन्स’ समोर त्यांच्या पाठीमागून एक कंटेनर (क्रं.एम.एच.१२ बी.एक्स.८९७७) हा याने त्यांना जोराची धडक दिली असून त्यात फिर्यादीचे वडील बाबुराव साळुंके हे रस्त्यावर जोराने पडून त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत होऊन ते गंभीर जखमी झाले आहे.तर फिर्यादी सुनील साळुंके हे किरकोळ जखमी झाले आहे.त्यांना फिर्यादी मुलाने तातडीने रुगवाहिका बोलावून कोपरगाव येथील ग्रामीण रुग्णालयात भरती केले असून त्या दरम्यान उपचार सुरु असताना त्याचे निधन झाले आहे.त्यांनी या प्रकरणी कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात धाव घेऊन गुन्हा दाखल केला आहे.

कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात पोलिसांनी आपल्या दप्तरी गु.नोंद क्रं.१०२/२०२३ भा.द.वि.कलम २७९,३०४(अ),३३८,४२७,मोटार वाहन कायदा-१९८८चे कलम १८४,१३४(अ)१३४(ब)१७७ अन्वये कंटेनरचा अज्ञात चालका विरुद्ध नुकताच गुन्हा दाखल केला आहे.पुढील तपास नूतन पोलिस निरीक्षक रामराव ढिकले यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार राजू पुंड हे अधिकारी हे करीत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close