गुन्हे विषयक
दोन वाहनांची धडक,कोपरगावात गुन्हा दाखल

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव तालुक्यातील नगर-मनमाड नूतन राष्ट्रीय मार्गावर दूधाचे पाऊच घेऊन नाशिक जिल्ह्यातील कळवण येथे जाणाऱ्या माजदा कंपनीच्या येसगाव शिवारातील हॉटेल अनिकेत या हॉटेल समोर उभ्या असललेल्या टेंपोला (क्रं.एम.एच.१७ बी.वाय.३४३०) मागावून येणाऱ्या ट्रकने क्रं.एम.एच.४१ जी.९३००) जोराची धडक दिली असून यात या टेंपोचे मोठे नुकसान झाले आहे.या प्रकरणी टेंपो चालक गोरख जगन्नाथ फडे (वय-६१) रा.शिंगणापूर यांनी गुन्हा दाखल केला आहे.
संकल्पित छायाचित्र.
फिर्यादी हा दि.२१ डिसेंबर रोजी सायंकाळी ०७.३० वाजेच्या सुमारास कोपरगाव येथील एका दूध संघाचे दुधाचे पाऊच घेऊन वणी मार्गे नाशिक जिल्ह्यातील कळवण येथे जात असताना ते काही कामानिमित्त येसगाव येथील,’हॉटेल अनिकेत’ येथील हॉटेल समोर असलेल्या गतिरोधक जवळ गाडी बाजूस घेऊन थांबले असताना मागून भरधाव वेगाने येणाऱ्या ट्रकने त्यांच्या वाहनास जोराची धडक दिली आहे.त्यात टेंपो चालक यांच्या जीवितास धोका निर्माण केला आहे या प्रकरणी कोपरगावात गुन्हा दाखल झाला आहे.
सदरचे सविस्तर वृत असे की,”फिर्यादी हा कोपरगाव तालुक्यातील शिंगणापूर येथील रहिवासी असून तो टेंपोचालक आहे.तो दि.२१ डिसेंबर रोजी सायंकाळी ०७.३० वाजेच्या सुमारास कोपरगाव येथील एका दूध संघाचे दुधाचे पाऊच घेऊन वणी मार्गे नाशिक जिल्ह्यातील कळवण येथे जात असताना ते काही कामानिमित्त येसगाव येथील,’हॉटेल अनिकेत’ येथील हॉटेल समोर असलेल्या गतिरोधक जवळ गाडी बाजूस घेऊन थांबले होते.दरम्यान मागून भरधाव वेगाने येणाऱ्या वरील क्रमांकाच्या ट्रकने त्यांच्या वाहनास जोराची धडक दिली आहे.त्यात टेंपो चालक यांच्या जीवितास धोका निर्माण केला होता.व टेंपोच्या नुकसानींस कारणीभूत झाले आहेत.या प्रकरणी टेंपो चालक यांनी कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.दरम्यान घटनास्थळी पोलीस निरीक्षक देसले,सहाय्यक फौजदार ए.एम.आंधळे यांनी तत्काळ भेट दिली आहे.
दरम्यान पहिल्या गुन्ह्या प्रकरणी कोपरगाव शहर पोलिसांनी आपल्या दप्तरी अज्ञात चालकाविरुद्ध गुन्हा क्रं.५१७/२०२२भा.द.वि.कलम २७९,३३६,४२७,व मोटार वाहन कायदा कलम १८४ अन्वये वरील क्रमांकाच्या ट्रक चालका विरुद्ध दाखल केला आहे.पुढील तपास पोलीस निरीक्षक देसले यांचे मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार आंधळे हे करीत आहेत.