जाहिरात-9423439946
गुन्हे विषयक

दुचाकीस्वारास उडवले,कोपरगावात गुन्हा दाखल

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव तालुक्यातील तळेगाव मळे ग्रामपंचायत हद्दीत काल दुपारी १.३० वाजेच्या सुमारास जुना मुंबई-नागपूर या महामार्गावर एका कंटेनरने (क्रं.एम.एच,४० बी.जी.५४०) दुचाकीस (क्रं.एच.एच.१७ सी.एफ.६१४) दिलेल्या धडकेत भऊर ता.वैजापूर येथील रहिवासी असलेले इसम मुनिर वजीर इनामदार (वय-५३) हे जागीच ठार झाले असून त्याचे सहकारी अशोक तबाजी दिवे गंभीररित्या जखमी झाले आहे.या प्रकरणी धोत्रे येथील इसम मुक्तार उस्मान सय्यद (वय-४९) यांनी कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात कंटेनर चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

सदर घटना इतकी भीषण होती की त्यात मयत इसम मुनीम इनामदार यांचे देहाचे काही तुकडे होऊन रस्त्यावर इतस्ततः पडले होते.व काही अंतरावर सदर कंटेनर थांबला होता.तर अपघातग्रस्त होऊन दुचाकी नुकसान होऊन पडलेली होती.तर त्यांचा सहकारी हा गंभीर होऊन पडला होता त्यास नजीकच्या नागरिकांनी व तालुका पोलिसांनी तातडीने रुग्णवाहिका पाचारण करून त्यांना उपचारार्थ कोपरगाव येथील ग्रामीण रुग्णालयात भरती केले होते.

सदरचे सविस्तर वृत्त असे की,फिर्यादी इसम मुक्तार सय्यद हे कोपरगाव तालुक्यातील धोत्रे येथील रहिवासी असून त्यांचा चिकणचा व्यवसाय आहे.त्यांचेकडे भेटण्यासाठी भऊर येथील नातेवाईक मयत इसम मुनिर इनामदार हे आले होते.ते साधारण १२.३० वाईजच्या सुमारास भेटून व चहापाणी घेऊन निघून जात असताना त्यांची दुचाकी नादुरुस्त झाली होती.गावातील दुकान बंद असल्याने त्यांनी आपले मित्र नवनाथ अशोक माळवदे यांची दुचाकी (क्रं.एच.एच.१७ सी.एफ.६१४) हि देऊन तळेगाव मळे येथून तातडीने पंक्चर काढून येण्यास सांगितले होते.त्यांच्या मदतीला त्यांनी आपला दुसरा सहकारी अशोक तबाजी दिवे यास दिले होते.त्यानंतर अवघ्या काही वेळात सुमारे दोनच्या सुमारास आपल्याला नवनाथ माळवदे यांचा फोन आला त्यात त्यांनी,”तुमच्या पाहुण्यांचा तळेगाव फाट्याजवळ अपघात झाल्या”ची कल्पना दिली होती.

अपघातग्रस्त दुचाकी छायाचित्रात दिसत आहे.

त्यानंतर आपण तातडीने घटनास्थळी गेलो असताना त्या ठिकाणी सदर ठिकाणी वरील क्रमांकाच्या एका कंटेनरचे दुचाकीस्वार पाहुणे आणि त्यांच्या सहकाऱ्यांस उडवले होते व त्यात पाहुणे जागेवरच ठार झाले होते.घटनास्थळी त्याच गावातील इसम विलास शिंदे यांनी या घटनेला दुजोरा दिला आहे.

सदर घटना इतकी भीषण होती की त्यात मयत इसम मुनीम इनामदार यांचे देहाचे काही तुकडे होऊन रस्त्यावर इतस्ततः पडले होते.व काही अंतरावर सदर कंटेनर थांबला होता.तर अपघातग्रस्त होऊन दुचाकी नुकसान होऊन पडलेली होती.तर त्यांचा सहकारी हा गंभीर होऊन पडला होता त्यास नजीकच्या नागरिकांनी व तालुका पोलिसांनी तातडीने रुग्णवाहिका पाचारण करून त्यांना उपचारार्थ कोपरगाव येथील ग्रामीण रुग्णालयात भरती केले होते.

छायाचित्रात घटनास्थळ दिसत आहे.

या प्रकरणी फिर्यादी मुक्तार सय्यद यांनी अज्ञात कंटेनर विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.कंटेनर चालक हा घटनास्थळावरून फरार झाला होता.या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

कोपरगाव तालुका पोलिसांनी या प्रकरणी अज्ञात चालकांवर गुन्हा क्रं.४८२/२०२२ भा.द.वि.कलम ३०४(अ) २७९,३३७,३३८,४२७,मोटार वाहन अधिनियम १८४,१३४(अ) १३४(ब)१७७ प्रमाणे दाखल केला आहे.पुढील तपास पोलिस निरीक्षक दौलतराव जाधव यांचे मार्गदर्शनाखाली पो.हे.कॉ.राजेंद्र म्हस्के हे करीत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close