जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
निवड

भ्रष्टाचार विरोधी जनआंदोलन पदाधिकाऱ्यांची निवड जाहीर

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव तालुक्यातील भ्रष्टाचार विरोधी जनआंदोलन न्यास या संघटनेच्या नूतन पदाधिकार्याचीन निवड जाहीर झाली असून यात अध्यक्षपदी शंकरराव सयाजी फटांगरे यांची तर उपाध्यक्षपदी व्यंकटराव परशराम धट तर सचिवपदी उमेश जयवंत माकूणे यांची निवड झाली आहे.नूतन पदाधिकाऱ्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

बराच काळ प्रत्यक्ष आंदोलनांपासून दूर राहिल्यानंतर ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या भ्रष्टाचार विरोधी जन आंदोलन न्यास या संघटनेची फेरबांधणी करण्यात येत आहे.काही जुन्या कार्यकर्त्यांना नारळ देऊन नव्यांचा समावेश केला जात आहे.त्यासाठी राज्यभर तालुका ते जिल्हास्तरापर्यंत कार्यकर्त्यांच्या निवडीसाठी बैठका बोलाविण्यात आल्या होत्या त्यात हि निवड जाहीर झाली आहे.

बराच काळ प्रत्यक्ष आंदोलनांपासून दूर राहिल्यानंतर ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या भ्रष्टाचार विरोधी जन आंदोलन न्यास या संघटनेची फेरबांधणी करण्यात येत आहे.काही जुन्या कार्यकर्त्यांना नारळ देऊन नव्यांचा समावेश केला जात आहे.त्यासाठी राज्यभर तालुका ते जिल्हास्तरापर्यंत कार्यकर्त्यांच्या निवडीसाठी बैठका बोलाविण्यात आल्या होत्या.नगर जिल्ह्यासह कोपरगाव तालुक्यातही नुकतीच एक बैठक संपन्न झाली असून त्यात हा फेरबदल झाला आहे.यात हि नूतन कार्यकारिणी जाहीर केली असल्याची माहिती हाती आली आहे.दरम्यान यान निवडीत सह-सचिव पदी मनोज अण्णासाहेब वाळुंज यांची तर खजिनदार पदी चांगदेव दत्तात्रय जुंधारे आदींची निवड झाली आहे.

सदर प्रसंगी कृष्णा घायतडकर,राधु कोल्हे,मच्छीन्द्र कोळपे,संजय निकम,बाळासाहेब गुरसळ,अंबादास सोनवणे,राजू आव्हाड आदी मान्यवर उपस्थित होते.नूतन पदाधिकाऱ्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close