जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
गुन्हे विषयक

कोपरगाव तालुक्यात पहाटे दरोडा,तीन लाखांची लूट

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा
कोपरगाव-संवत्सर-(प्रतिनिधी)

कोपरगाव तालुक्याच्या पूर्वेस साधारण सहा कि.मी.अंतरावर असलेल्या संवत्सर शिवारात रहिवासी असलेल्या गोदावरी दूध संघाचे राजेश परजणे यांच्या वस्तीजवळ रहिवासी असलेले शेतकरी अनिल हरिभाऊ सोनवणे यांच्या वस्तीवर आज पहाटे १.३० च्या सुमारास ६-७ जणांच्या दरोडेखोरांच्या टोळीने चाकुसारख्या हत्याराचा धाक दाखवून घरात प्रवेश करून घर मालक अनिल सोनवणे यांच्यावर हल्ला करून त्याच्या घरातील रोख १५ हजार रुपये व सोने-नाणे अशा चिज वस्तू मिळून अंदाजे २ लाख ८१ हजार ५०० रुपयांचा ऐवज लंपास केला असून यात दोन महिलांना जखमी केले असून चोरी नंतर पोबारा केला असल्याने संवत्सर सह तालुक्यात खळबळ उडाली आहे.

आज पहाटे दीड च्या सुमारास शेतकरी अनिल सोनवणे यांना कोणीतरी आपली खिडकी वाजवत असल्याची कुणकुण लागली होती.घरमालक अनिल सोनवणे यांना जाग आल्यावर त्यांना आपल्या घराच्या खिडकीजवळ तीन-चार संशयित आढळून आले त्यांना त्यां संशयितांना याचा जाब विचारला होता.त्यावर संबंधित दरोडेखोरांना दरडावले मात्र त्यांनी त्यांना चाकूचा धाक दाखवून घराचा दरवाजा उघडण्यास भाग पाडले होते.त्या झटापटीत ते स्वतः भावजाई,आई असे तिघे जण जखमी झाले आहे.

हीच ती संवत्सर येथील अनिल सोनवणे यांची दरोडा पडलेली वस्ती.

सदरचे सविस्तर वृत्त असे की,कोपरगाव तालुक्यात चोरट्यानी आपल्या लीला सुरु केल्या असून उन्हाळ्यातील मे महिन्यात आपेगाव येथील दांपत्याची हत्या केल्यानंतर याच चोऱ्यांमध्ये सातत्याने वाढ होताना दिसून येत आहे.अशीच घटना दि.१५ सप्टेंबरच्या रात्री १.३० वाजेच्या सुमारास घडली असून सदर कुटुंब आपले नियत कर्म करून चौदा सप्टेंबरच्या रात्री झोपी गेले असताना रात्री एकच्या सुमारास त्यांना कोणीतरी आपली खिडकी वाजवत असल्याची कुणकुण लागली होती.घरमालक अनिल सोनवणे यांना जाग आल्यावर त्यांना आपल्या घराच्या खिडकीजवळ तीन-चार संशयित आढळून आले त्यांना त्यां संशयितांना याचा जाब विचारला होता.त्यावर संबंधित दरोडेखोरांना दरडावले मात्र त्यांनी त्यांना चाकूचा धाक दाखवून घराचा दरवाजा उघडण्यास भाग पाडले होते.

घटनास्थळीं पोलिसांनी धाव घेऊन तपास सुरू केला आहे त्याचे छायाचित्र.

त्यांनी त्यांना विरोध करून पहिला दरवाजा उघडण्यास विरोध केला मात्र तो सहा-सात जणांच्या पुढे तोकडा पडला होता.त्यामुळे चोरट्यानी शास्राचा बळावर घरात प्रवेश करून घरमालक सोनवणे यांच्याशी झटापट केली होती.त्यात घरमालक सोनवणे व त्यांची पत्नी कविता सोनवणे यांचा विरोध तोकडा पडला.त्यात त्यांच्या डोक्यावर जबर मार लागला असून पोटावर चाकूने वार झाले आहेत.तर त्याचा प्रतिकार कमी पडल्यावर त्यांच्या भावजयी सुनीता बबन सोनवणे यांनीही विरोध करुन पाहिला मात्र त्यांना दरोडेखोरांच्या सामूहिक शक्तीसमोर त्याही कमी पडल्या त्यात स्वतः अनिल सोनवणे व त्यांची भावजयी सुनीता सोनवणे यांचेसह आई सुगंधाबाई सोनवणे या जखमी झाल्या आहेत. त्यांच्या पायावर चोरट्यानी लोखंडी गजाने मारहाण करून त्यांना गंभीर दुखापत केली आहे.

दरम्यान या झटापाटी नंतर घरातील रोख ७ हजार रकमेसह २ लाख ८७ हजारांचा ऐवज लांबवला आहे.त्यात ७ हजारांची रोख रक्कम त्या नंतर दोन भ्रमणध्वनी अंदाजे किंमत ७ हजार ५०० रुपये,विविध दागिने त्यात १ लाख ११ हजारांचे सोन्याचे गंठण,पाच ग्रॅम सोन्याचे बिस्कीट,पाच ग्रॅम सोन्याची अंगठी,तीन ग्रॅम सोन्याच्या रिंगा,दोन ग्रॅम मंगळसूत्र,१२ ग्रॅम सोन्याची चैन,वीस ग्रॅम मोहनमाळ,दोन तोळे सोन्याचे गंठण,आदी सोन्या-नाणे आदीं चीजवस्तूची बॅग चोरट्यानी पळवली नजीकच्या सोयाबीनच्या शेतात जाऊन उचकपाचक करून त्यातील वस्तूंचा घेऊन पोबारा केला आहे.गेलेल्या दागिन्यांचा फिर्यादी महिला कविता अनिल सोनवणे,त्यांची सासू सुगंधाबाई सोनवणे,व जाऊबाई सुनीता बबन सोनवणे यांच्या दागिन्यांचा समावेश आहे.

दरम्यान या घटनेची माहिती गावातील व नजीकच्या शेतकऱ्यांना कळल्यावर त्यांनी वस्तीकडे धाव घेऊन त्यांना उपचारार्थ कोपरगाव ग्रामीण रुग्णालयात भरती केले होते.त्या नंतर त्यांना शिर्डी येथील सुपर स्पेशालिटी रुग्णलयात भरती केले होते.

दरम्यान हि घटना कोपरगाव शहर पोलिसांना समजल्यावर त्यांनी घटनास्थळी सकाळी सातच्या सुमारास पोलीस निरीक्षक वासुदेव देसले,उपनिरीक्षक रोहिदास ठोंबरे यांनी आपल्या सहकाऱ्यासंमवेत धाव घेतली आहे.व त्या ठिकाणचा पंचनामा केला आहे.त्या ठिकाणी श्वान पथकास पाचारण केले असून संशयितांना शोधण्याची मोहीम सुरु केली आहे.

कोपरगाव ठाण्यात फिर्यादी कविता अनिल सोनवणे (वय-५०) रा.संवत्सर यांच्या फिर्यादीवरून गुन्हा पूर्ण तपास केल्यानंतर उशिरा दाखल केला आहे.श्वान पथक आणूनही आरोपींचाच छडा लागलेला नाही.

घटनास्थळी पोलीस अधीक्षक मनोज पाटील,श्रीरामपूरच्या अतिरिक्त पोलीस अधीक्षक स्वाती भोर,शिर्डी उपविभागीय पोलीस अधिकारी संजय सातव,कोपरगाव शहर पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक वासुदेव देसले यांनी भेट दिली आहे.

कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा क्रं.२८७/२०२२ भा.द.वि.कलम ३९५,३९७ प्रमाणे अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हा उशीरा दाखल केला आहे.या घटनेन्स संवत्सर परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.पुढील तपास पोलीस निरीक्षक वासुदेव देसले यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक रोहिदास ठोंबरे हे करीत आहेत.

जाहिरात-9423439946

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Close
Close