गुन्हे विषयक
कोपरगावात दगडफेक,शस्रासह तीन आरोपी जेरबंद,एक फरार,गुन्हा दाखल

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव शहरात जिजामाता उद्यानाजवळ काही तरुणांच्या टोळक्याने रात्रीच्या सुमारास गोंधळ घालून दगडफेक केल्या प्रकरणी त्या ठिकाणी कोपरगाव शहर पोलिसांनी धाड टाकली असता चार तरुणांना शस्रासह अटक केली आहे त्यामुळे शहरात खळबळ उडाली आहे.
संकल्पितच छायाचित्र.
रात्री ११.३० वाजेच्या सुमारास स्वामी समर्थ मंदिराजवळ रस्त्यावर चार तरुण हिरो होंडा दुचाकींजवळ (क्रं.एम.एच.०२ ई.ए.८४८०) संशयितरित्या घोळका करून व तोंडाला रुमाल बांधून आपले अस्तित्व लपविण्यासाठी तोंडे लपून बसलेले आढळले होते.त्यानुसार त्या ठिकाणी पोलिसांनी धाड टाकली असता त्यानीं धूम ठोकली होती.पोलिसानी त्यांचा पाठलाग करून पकडले असून या ठिकाणी किशोर लक्ष्मण चिने सह तिघांना पकडले असून एक जण फरार झाला आहे.त्यामुळे शहरात खळबळ उडाली आहे.
सदरचे सविस्तर वृत्त असे की,”कोपरगाव शहरात गणेशोत्सव नुकताच शांततेत पार पडला आहे.त्यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त ठेवला होता.दरम्यान कुठेही अनुचित प्रकार घडला नव्हता.मात्र गणेशोत्सव पार पडल्या नंतर तीन दिवसांनी दि.१२ सप्टेंबर रोजी रात्री कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात गोपीनाथ कांदळकर व जे.पी.तमनर आदी पोलीस कर्मचारी हे आपल्या कर्तव्यावर तथा गस्तीवर असताना त्यांना रात्री ८ वाजेच्या सुमारास एक दूरध्वनी आला असता त्यात खबर देणाऱ्या इसमाने पोलिसना खबर दिली की,”जिजामाता उद्यानानजीक काही तरुणांनी गोंधळ घातला असून त्यात काहींनी दगडफेक केली असून सामाजिक शांतता भंग केली आहे.
त्यानुसार रात्रीच्या सुमारास तेथील कर्तव्यावर असलेल्या पोलिसांनी घटना स्थळी धाव घेतली असता.त्या ठिकाणी त्यांना रात्री ११.३० वाजेच्या सुमारास स्वामी समर्थ मंदिराजवळ रस्त्यावर चार तरुण हिरो होंडा दुचाकींजवळ (क्रं.एम.एच.०२ ई.ए.८४८०) संशयितरित्या घोळका करून व तोंडाला रुमाल बांधून आपले अस्तित्व लपविण्यासाठी तोंडे लपून बसलेले आढळले होते.त्यानुसार त्या ठिकाणी पोलिसांनी धाड टाकली असता त्यानीं धूम ठोकली होती.पोलिसानी त्यांचा पाठलाग करून पकडले असून या ठिकाणी किशोर लक्ष्मण चिने,रा.दत्तनगर कोपरगाव यास पकडले आहे.तर रामा (पूर्ण नाव माहिती नाही) आकाश आव्हाड,(पूर्ण नाव माहिती नाही) किशोर ठोकळ सर्व रा.कोपरगाव शहर.या झटापटी दरम्यान एक आरोपी किशोर ठोकळ हा पळून गेला आहे.दरम्यान त्यांची पोलिसांनी झडती घेतली असता दुचाकीच्या सीट खाली त्यांना खालील शस्र मिळून आले आहे.
त्यात या आरोपींजवळ एक वरील क्रमांकाची ३५ हजार रूपये किमतीची दुचाकी व १६.६ इंच लांबीचे व दोन इंच धारधार रुंदीचे शस्र,दुसरे धारदार १३ इंच लांबीचे लोखंडी पाते व त्यास ४.५ इंच प्लास्टिक मूठ असलेले शस्र,एक २१.५इंच लांबीचा लोखंडी पाईप असा ऐवज मिळून आला आहे.
दरम्यान कोपरगाव शहर पोलिसानी या प्रकरणी आपल्या दप्तरी गु.क्रं.२८३/२०२२ भा.द.वि.कलम १२२ शस्र अधिनियम १९५९ चे कलम ४,२५,भा.दंड.संहिता १८६० चे कलम ३४ प्रमाणे पहाटे ३.०७ वाजेच्या सुमारास गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक वासुदेव देसले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरिक्षक एस.सी.पवार हे करत आहेत.