जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
गुन्हे विषयक

कोपरगाव तालुक्यात एकाचा मृत्यू,अकस्मात नोंद दाखल

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव तालुक्यातील सोनेवाडी ग्रामपंचायत हद्दीत रहिवासी असलेला आपला मुलगा हा नारायण हरिभाऊ भिवराव जावळे (वय-२८) हा गट क्रं.२९२(१) मध्ये नवले यांचे चिकूचे बागेत मृत स्थितीत आढळून आला असल्याची फिर्याद हरिभाऊ शिवराम जावळे यांनी कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात दाखल केली आहे.त्यामुळे सोनेवाडी परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.

मयत मुलगा नारायण जावळे हा आपली शेती करून गवंडी काम करत होता.त्याला दारूचे व्यसन होते.त्यातून बऱ्याच वेळा त्याचे गावातील कोणाशी ना कोणाशी भांडणे होत असत.तो दि.३० जुलै सायंकाळ पासून बेपत्ता होता.तो रात्र होऊनही घरी आला नाही.त्याचा त्याच्या वडिलांनी व नातेवाईकांनी शोध घेऊनही तो त्या दिवशी सापडला नाही.गावात पाहत असताना त्यांना गावातील गवत आणणाऱ्या महिलेने तो एका शेतकऱ्याच्या बागेत मृत अवस्थेत असल्याचे सांगितले आहे.

सदरचे सविस्तर वृत्त असे की,”फिर्यादी हरिभाऊ जावळे हे आपल्या सोनेवाडी हद्दीत कोऱ्हाळे रस्त्यावर रहिवासी असून त्या ठिकाणी ते आपली पत्नी गुंफाबाई जावळे,मुलगा नारायण जावळे,सून योगीता जावळे हे आपल्या नातवंडासह रहात आहे.त्यांचा मयत मुलगा नारायण जावळे हा आपली शेती करून गवंडी काम करत होता.त्याला दारूचे व्यसन होते.त्यातून बऱ्याच वेळा त्याचे गावातील कोणाशी ना कोणाशी भांडणे होत असत.
तो दि.३० जुलै सायंकाळ पासून बेपत्ता होता.तो रात्र होऊनही घरी आला नाही.त्याचा त्याच्या वडिलांनी व नातेवाईकांनी शोध घेऊनही तो त्या दिवशी सापडला नाही.गावात पाहत असताना त्यांना गावातील गवत आणणाऱ्या महिलेने सांगितले की,”तुमचा मुलगा नवले यांचे चिकूच्या बागेत पडलेला आहे.त्या बातमी सरशी कुटुंबातील सदस्यांनी त्या घटनास्थळी धाव घेतली असता त्या ठिकाणी त्यांचा मुलगा उताण्या स्थितीत मृत आढळून आला आहे.त्यांनी त्या ठिकाणी गावातील बघ्याची गर्दी झाली होती.त्या नंतर गावातील काही नागरिकांनी कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात हि खबर दिली होती.त्या नुसार घटनास्थळी पोलीस आले.त्यांनी घटनास्थळाचा पंचनामा केला आहे.

या प्रकरणी त्यांनी कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद दाखल केली आहे.घटनास्थळी सहाय्यक फौजदार एम.ए.कुसारे यांनी भेट दिली आहे.

कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात पोलीसांनी आपल्या अकस्मात मृत्यू नोंद दप्तरी नोंद दाखल केली आहे.पुढील तपास पोलीस निरीक्षक जाधव यांचे मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार कुसारे हे करीत आहेत.

जाहिरात-9423439946

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Close
Close