गुन्हे विषयक
चोरट्यांची महावितरण कंपनीवर वक्रदुष्टी,पन्नास हजारांची चोरी,गुन्हा दाखल

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव तालुक्यातील डाऊच खुर्द शिवारातील गट क्रं.२ व ३ येथील दोन विद्युत रोहित्रावरील डी. ओ’ सेट कट करून दोन्ही रोहित्र खाली पाडून त्यातील २७० ली.ऑइल काढून ५० हजार रुपये किमतीची ६८ कि.ग्रॅ.वजनाची तांब्यांची तार अज्ञात चोरट्यांनीं चोरून नेली असल्याचा गुन्हा तेथील कनिष्ठ अभियंता सोमनाथ निवृत्ती निरगुडे (वय-४९) रा.चांदेकसारे यांनी कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात दाखल केला आहे.त्यामुळे शेतकऱ्यांत भीतीचे वातावरण पसरले आहे.
महावितरण कंपनीच्या हद्दीत डाऊच खुर्द हा शिवार येतो.ठिकाणी गट क्रं.२ व ३ येथे सुमारे २५ के.व्ही.ए.क्षमतेचे दोन विद्युत रोहित्र शेतकऱ्यांच्या विद्युत पंपांना वीज पुरवठा करण्यासाठी बसविण्यात आलेले होते.त्यात प्रत्येकी ६८ कि.ग्रॅम वजनाची ५० हजार रुपये किमतीची तांब्यांची तार होती.अज्ञात चोरट्याने कोणाचे लक्ष नाही हि संधी साधून त्या विद्युत रोहित्रातील तांब्यांची विद्युत वाहक आपल्या आर्थिक फायद्यासाठी लबाडीच्या इराद्याने चोरून नेली आहे.
सदरचे सविस्तर वृत्त असे की,”वर्तमानात चोरट्यांची वक्रदुष्टी महावितरण कंपनीच्या विद्युत रोहित्रावर पडलेली दिसत असून मागील दोन महिन्यांपूर्वी ब्राम्हणगाव हद्दीतील येसगाव शिवारात शंकर बाग विद्युत रोहित्रा जवळ पोल क्रं.०९ असून त्यावरील सुमारे १२ हजार रुपये किमतीची सहाशे मीटर विद्युत वाहक तार अज्ञात चोरट्यानीं आपल्या आर्थिक फायद्यासाठी लबाडीच्या इराद्याने चोरून नेली होती.या प्रकरणी त्यांनी कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असतानाच आता डाऊच खुर्द शिवारात दुसरी घटना उघड झाली आहे.
सदरचे सविस्तर वृत्त असे की,फिर्यादी सोमनाथ निरगुडे हे चांदेकसारे येथील रहिवासी असून त्यांचे महावितरण कंपनीचे गट कार्यालय चांदेकसारे येथे आहे.त्यांच्या हद्दीत डाऊच खुर्द हा शिवार येतो.ठिकाणी गट क्रं.२ व ३ येथे सुमारे २५ के.व्ही.ए.क्षमतेचे दोन विद्युत रोहित्र शेतकऱ्यांच्या विद्युत पंपांना वीज पुरवठा करण्यासाठी बसविण्यात आलेले होते.त्यात प्रत्येकी ६८ कि.ग्रॅम वजनाची ५० हजार रुपये किमतीची तांब्यांची तार होती.अज्ञात चोरट्याने कोणाचे लक्ष नाही हि संधी साधून त्या विद्युत रोहित्रातील तांब्यांची विद्युत वाहक आपल्या आर्थिक फायद्यासाठी लबाडीच्या इराद्याने चोरून नेली आहे.या प्रकरणी त्यांनी कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा फिर्यादी यांनी गुन्हा दाखल केला आहे.घटनास्थळी कोपरगाव तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक भरत दाते,पो.हे.कॉ.लिंबोरे यांनी भेट दिली आहे.
कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात पोलीसांनी अज्ञात आरोपी विरुद्ध आपल्या दप्तरी गु.र.क्रं.२३८/२०२२ भारतीय विद्युत अधिनियम २००३ चे कलंम १३६ प्रमाणे दाखल केला आहे.पुढील तपास पोलीस निरीक्षक जाधव यांचे मार्गदर्शनाखाली पो.हे.कॉ.लिंबोरे हे करीत आहेत.