जाहिरात-9423439946
गुन्हे विषयक

जमीन वाटप प्रकरण,हाणामारी करून विष पाजले,कोपरगावात सात जणांविरुद्ध गुन्हा

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगांव तालुक्यातील पढेगाव ग्रामपंचायत हद्दीतील रहिवासी असलेले अशोक सुखदेव पगारे (वय-४५) हे व त्यांची पत्नी हे दोघे आपल्या मक्याच्या शेतात खुरपणी करत असताना आरोपी भाऊ जनार्दन सुखदेव पगारे त्याचा मुलगा यास सात जणांनी,”तुझी जमीन आमच्या नावावर करून दे” असे म्हणून गैर कायद्याची मंडळी जमवून वाईट वाईट शिवीगाळ करून लाथाबुक्यांनी मारहाण करून तसेच काहीतरी विषारी औषध बळजबरीने फिर्यादी भावाच्या तोंडात ओतले व जीवे मारण्याची धमकी दिली आहे.या प्रकरणी कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात सात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.

फिर्यादी इसमाचे शेताचा गट क्रं.२८८/४ मध्ये ते मका पिकाची खुरपणी करत असताना त्या ठिकाणी फिर्यादी इसमाचा भाऊ जनार्दन आहेर हा आला.त्याचे समवेत त्याचा मुलगा व अन्य पाच जणांनी फिर्यादी अशोक पगारे यास म्हणाले की,”तुझी जमीन आमच्या नावावर करून दे” असे म्हणून गैर कायद्याची मंडळी जमवून वाईट वाईट शिवीगाळ करून लाथाबुक्यांनी मारहाण करून तसेच काहीतरी विषारी औषध बळजबरीने फिर्यादी भावाच्या तोंडात ओतले व जीवे मारण्याची धमकी दिली आहे.

सदरचे सविस्तर वृत्त असे की,फिर्यादी अशोक पगारे व त्यांची पत्नी हे वरील गावचे रहिवासी आहे.त्यास एक भाऊ असून ते विभक्त आहे. त्यांच्यात अनेक वर्षपासून जमीन वाटपाचा वाद आहे.दि.२९ जुलै रोजी सकाळी ११ वाजेच्या सुमारास फिर्यादी इसमाचे शेताचा गट क्रं.२८८/४ मध्ये ते मका पिकाची खुरपणी करत असताना त्या ठिकाणी फिर्यादी इसमाचा भाऊ जनार्दन आहेर हा आला.त्याचे समवेत त्याचा मुलगा वैभव जनार्दन आहेर,भाऊसाहेब भीमराज पगारे,हर्षद भाऊसाहेब पगारे,नंदाबाई जनार्दन पगारे,सविता भाऊसाहेब पगारे,आरती वैभव पगारे,सर्व राहणार पढेगाव यांनी फिर्यादी अशोक पगारे यास म्हणाले की,”तुझी जमीन आमच्या नावावर करून दे” असे म्हणून गैर कायद्याची मंडळी जमवून वाईट वाईट शिवीगाळ करून लाथाबुक्यांनी मारहाण करून तसेच काहीतरी विषारी औषध बळजबरीने फिर्यादी भावाच्या तोंडात ओतले व जीवे मारण्याची धमकी दिली आहे.या प्रकरणी कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात सात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.

फिर्यादी अशोक पगारे याने कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात भाऊ त्याची पत्नी पुतणे असे मिळून सात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

दरम्यान या प्रकरणी कोपरगाव तालुका पोलिसांनी आपल्या दप्तरी क्रं.२९२/२०२२ भा.द.वि.कलम ३२४,३२३,५०४,५०६,१४३,१४७,१४९ अन्वये नोंद केली आहे.पुढील तपास पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस हे.कॉ.एन.एस.शेख हे करीत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close