जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
गुन्हे विषयक

महिलेचा विनयभंग,कोपरगावात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव तालुक्यातील सांगवी भुसार ग्रामपंचायत हद्दीत रहिवासी असलेल्या महिलेची पाण्याची नळी रस्त्यावर पडलेली असताना त्यावरून दुचाकी घालून दुचाकीस्वार पडला असताना त्यांस उचलण्यास सदर फिर्यादी महिला गेली असतांना तिला मारहाण करून तिचे ब्लाउज फाडून तीला लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन आरोपी कासार याने केले असून फिर्यादीच्या पतीस खुंटीने मारहाण केली असल्याचा गुन्हा कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात दाखल झाल्याने सांगवी भुसार आणि परिसरात खळबळ उडाली आहे.

सांगवी भुसार येथील फिर्यादीने आपल्या घरासमोर पाणी घेण्यासाठी नळी पसरवलेली होती.त्यावरून तो व त्याची पत्नी असे दोघे घसरून पडले होते.त्याचा राग मनात धरून आरोपीने फिर्यादी महिलेस मारहाण करून तिचे ब्लाउज फाडून तीला लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन आरोपी श्री कासार याने केले असून फिर्यादीच्या पतीस खुंटीने मारहाण केली असल्याचा गुन्हा कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात दाखल झाला आहे.

सदरचे सविस्तर वृत्त असे की,फिर्यादी महिला हि सांगवी भुसार येथील रहिवासी आहे.त्याच गावातील आरोपी कासार व त्याची पत्नी सौ.कासार हि रहिवासी आहे.सोमवार दि.२५ जुलै रोजी दुपारी १२ वाजेच्या सुमारास आरोपी कासार हा आपल्या दुचाकीवरून फिर्यादीच्या घरासमोरील रस्त्यावरून जात असताना फिर्यादीने आपल्या घरासमोर पाणी घेण्यासाठी नळी पसरवलेली होती.त्यावरून तो व त्याची पत्नी असे दोघे घसरून पडले होते.त्याचा राग मनात धरून आरोपीने फिर्यादी महिलेस मारहाण करून तिचे ब्लाउज फाडून तीला लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन आरोपी श्री कासार याने केले असून फिर्यादीच्या पतीस खुंटीने मारहाण केली असल्याचा गुन्हा कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात दाखल झाल्याने सांगवी भुसार आणि परिसरात खळबळ उडाली आहे.

या प्रकरणी फिर्यादी महिलेने कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात धाव घेऊन या प्रकरणी आरोपी गायकवाड याचे विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
घटनास्थळी कोपरगाव तालुका पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस न निरीक्षक सुरेश आव्हाड,व पोलीस हे.कॉ.एस.डी. बोटे यांनी भेट दिली आहे.

या प्रकरणी कोपरगाव तालुका पोलिसांनी आपल्या दप्तरी नोंद क्रं.२८६/२०२२ भा.द.वि.कलम ३५४,३२४,३२३,५०४,५०६,३४ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.पुढील तपास पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव याचे मार्गदर्शनाखाली यांचे मार्गदर्शनाखाली पो.हे.कॉ.बोटे हे करीत आहेत.

जाहिरात-9423439946

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Close
Close