गुन्हे विषयक
नदी पात्रात तरुणांचे प्रेत,कोपरगावात उलटसुलट चर्चेला उधाण
न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव शहरा पासून हाकेच्या अंतरावर असलेल्या जेऊर पाटोदा ग्रामपंचायत हद्दीत गोदावरी नदी पात्राचे कडेला साधारण ३०-३५ वयाचे पुरुष जातीचे तरुणांचे अनोळखी प्रेत आढळून आले आहे.या प्रकरणी तेथील पोलीस पाटील हरिभाऊ सयाजी केकाण (वय-५२) यांनी कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात या प्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.या प्रकरणी उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे.
दरम्यान गोदावरी नदीस नुकताच पूर येऊन गेला आहे.वरील अज्ञात ठिकाणी अज्ञात तरुणांचा पाय घसरून तो पडला असावा व नदीत वाहत आला असावा असा कयास व्यक्त करण्यात येत आहे.या बाबत हा अपघात की खून याबाबत उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे.
या प्रकरणी खबर देणार पोलीस पाटील केकाण यांनी कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद दाखल केली आहे.घटनास्थळी पोलीस निरीक्षक वासुदेव देसले,पो.हे.कॉ.के.ए.जाधव यांनी भेट दिली आहे.
दरम्यान गोदावरी नदीस नुकताच पूर येऊन गेला आहे.वरील अज्ञात ठिकाणी अज्ञात तरुणांचा पाय घसरून तो पडला असावा व नदीत वाहत आला असावा असा कयास व्यक्त करण्यात येत आहे.या बाबत हा अपघात की खून याबाबत उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे.
या प्रकरणी कोपरगाव शहर पोलिसांनी आपल्या दप्तरी अकस्मात मृत्यू नोंद क्रं.४६/२०२२ सी.आर.पी.सी.१७४ प्रमाणे नोंद दाखल केली आहे.पुढील तपास पोलीस निरीक्षक देसले यांचे मार्गदर्शनाखाली यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस हे.कॉ.जाधव हे करीत आहेत.