गुन्हे विषयक
कोपरगाव तालुक्यात चोरी,दोन आरोपींवर गुन्हा दाखल

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव तालुक्यातील भोजडे ग्रामपंचायत हद्दीतील कोळ नदीवरील पुलाखाली असलेले दोन लोखंडी पोल व एक हिरो होंडा कंपनीची दुचाकी (क्रं.एम.एच.१७ वाय ३०७१) असा १३ हजार रुपयांचा ऐवज त्याच भागातील चोरटे काकासाहेब तुकाराम टुपके रा.तळेगाव मळे व नवनाथ लक्ष्मण भागवत रा.गवंडगाव आदींनी चोरून नेल्याची फिर्याद कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात राज इंफ्रास्ट्रक्चरचे पर्यवेक्षक संजय रामचंद्र यादव (वय-४६) रा.मिरढे ता.फलटण जि. सातारा.(ह.मु.झगडे फाटा) यांनी दखल केला आहे.त्यामुळे खळबळ उडाली आहे.
या गुन्ह्या प्रकरणी आरोपी काकासाहेब तुकाराम टुपके रा.तळेगाव मळे व नवनाथ लक्ष्मण भागवत रा.गवंडगाव आदींनी सुमारे ०५ हजार रुपये किमतीचे दोन लोखंडी पोल व एक हिरो होंडा कंपनीची वरील क्रमांकाची ०८ हजार रुपये किमतीची दुचाकी कोणाचे लक्ष नाही हि संधी साधत पळवून नेली आहे.या प्रकरणी फिर्यादी पर्यवेक्षक यादव यांनी कोपरगाव तालुका पोलिसांत गुन्हा दाखल केला आहे.
सदरचे सविस्तर वृत्त असे की,कोपरगाव तालु क्यात राज्याचा महात्वांकांशी असलेला मुंबई-नागपूर हा ७१० कि.मी.चा समृद्धी महामार्गाचे काम वेगाने सुरु असून ते काम अंतिम टप्यात आहे.सदरचे काम मंद गतीने केल्याने सदरचे काम गायत्री कन्ट्रक्शन काढून महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळाने काढून घेतले आहे.व आता ते राज इन्फ्रास्त्रचर या कंपनीस देण्यात आले आहे.या कंपनीत फिर्यादी संजय यादव हे पर्यवेक्षक म्हणून सेवेत आहे.त्यांचे कोपरगाव तालुक्याच्या पूर्वेस साधारण अठरा कि.मी.अंतरावर भोजडे ग्रामपंचायत हद्दीत कोळ नदीवर मोठ्या पुलाचे काम सुरु आहे.त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर लोखंडी ऐवज व अनेक चारचाकी,दहाचाकी,दुचाकी वहाने कार्यरत असतात.रात्रीच्या सुमारास ते उभे करून ठेवलेले असतात.त्यावर आपली चोरटी नजर ठेवून अनेक जण त्यावर हात मारीत असल्याच्या अनेक घटना अलीकडील काळात उघड झालेल्या आहेत.अशीच एक घटना दि.२४ जूनच्या पहाटे ०५ वाजेच्या सुमारास उघड झाली आहे.
त्यात आरोपी काकासाहेब तुकाराम टुपके रा.तळेगाव मळे व नवनाथ लक्ष्मण भागवत रा.गवंडगाव आदींनी सुमारे ०५ हजार रुपये किमतीचे दोन लोखंडी पोल व एक हिरो होंडा कंपनीची वरील क्रमांकाची ०८ हजार रुपये किमतीची दुचाकी कोणाचे लक्ष नाही हि संधी साधत पळवून नेली आहे.
या प्रकरणी फिर्यादी पर्यवेक्षक यादव यांनी कोपरगाव तालुका पोलिसांत गुन्हा दाखल केला आहे.
घटनास्थळी पोलीस निरीक्षक जाधव व पो.हे.कॉ.एस.डी.बोटे यांनी भेट दिली आहे.
कोपरगाव तालुका पोलिसांनी या प्रकरणी आपल्या दप्तरी गु.र.क्रं.२३२/२०२२ भा.द.वि.कलम ३७९,३४ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.पुढील तपास पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव यांचे मार्गदर्शनाखाली पो.हे.कॉ.आर.एम.म्हस्के हे करीत आहेत.