जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

कोपरगावात ऍट्रॉसिटी दाखल,तालुक्यात खळबळ

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव तालुक्यातील मायगाव देवी ग्रामपंचायत हद्दीत रहिवासी असलेली ३० वर्षीय महिलेचा त्याच गावातील आरोपी इसम भारत गायकवाड याने दि.१२ जुलै ते २४ जुलै दरम्यान महिलेचा पती घरी नसताना व नदीवर धुणे धुत असताना विनयभंग करून तिला लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केले आहे.या प्रकरणी सदर महिलेने आरोपी विरुद्ध ऍट्रॉसिटी कलमान्वये कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.त्यामुळे तालुक्यात खळबळ उडाली आहे.

अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंध) कायदा, १९८९ (कायद्याचे योग्य नाव) हा अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातींवरील अत्याचार आणि द्वेषपूर्ण गुन्हे रोखण्यासाठी लागू केलेला भारतीय संसदेचा एक कायदा आहे.हा कायदा एससी/एसटी कायदा, पीओए,अत्याचार प्रतिबंधक कायदा किंवा फक्त अॅट्रॉसिटी कायदा म्हणून देखील ओळखला जातो.या अंतर्गत अनुसूचित जाती जमाती यामधील नागरिकांना संरक्षण पुरवले आहे.तरीही अधुनमधुन या घटना उघडकीस येत असतात अशीच घटना मायगाव देवी येथे घडली आहे.

सदरचे सविस्तर वृत्त असे की,”फिर्यादी महिला हि आदिवासी समाजाची असून ती तिच्या पतीसमवेत मायगाव देवी ग्रामपंचायत हद्दीत रहाते.ती व तिंचा नवरा व ती आपला उदरनिर्वाह हा शेतमजुरी करून चालवतात.त्याच गावातील आरोपी गायकवाड हा तिच्यावर वाईट नजर ठेऊन होता.त्यानुसार पती घरी नसल्यावर सदर आरोपी हा सदर महिला हि नदीवर धुणे धुण्यासाठी गेल्यावर तिचा पाठलाग करत असे.दि.१२ जुलै पासून तो सातत्याने फिर्यादी महिलेचा पती नसल्यावर तिचा पाठलाग करून तिच्याशी लगट करून तिला लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन करत होता.अखेर या त्रासाला कंटाळून तिने हि बाब आपल्या पतीच्या लक्षात आणून दिली व याबाबत विचार विनिमय करून कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात धाव घेऊन या प्रकरणी आरोपी गायकवाड याचे विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

सदर घटनास्थळी शिर्डी येथील पोलीस उपविभागीय अधिकारी संजय सातव,कोपरगाव तालुका पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरेश आव्हाड यांनी भेट दिली आहे.

या प्रकरणी कोपरगाव तालुका पोलिसांनी आपल्या दप्तरी नोंद क्रं.२८२/२०२२ भा.द.वि.कलम ३५४,(ड)अनुसूचित जाती जमाती कायदा कलम ३ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.पुढील तपास जिल्हा पोलीस आधीक्षक यांचे मार्गदर्शनाखाली यांचे मार्गदर्शनाखाली शिर्डी उपविभागीय अधिकारी संजय सातव हे करीत आहेत.

जाहिरात-9423439946

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Close
Close