जाहिरात-9423439946
गुन्हे विषयक

बायकोची नवऱ्यास लाथाबुक्यांनी मारहाण,जमीन नावावर करण्याचा वाद,कोपरगावात गुन्हा

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव तालुक्यातील पढेगाव ग्रामपंचायत हद्दीत रहिवासी असलेल्या फिर्यादीची जमीन बायकोच्या नावावर करुण देण्यावरून बायको आणि दोन मुलांनी बापास लाठ्याकाठ्यांनी मारहाण केली असून त्यात आपल्याला जखमी केले असल्याचा गुन्हा मोहन पोपट पवार (वय-४१) यांनी कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात दाखल केला आहे.त्यामुळे पढेगाव व परिसरात खळबळ उडाली आहे.

फिर्यादी नवरा घरासमोर असताना त्याची पत्नी शोभा पवार फिर्यादिस म्हणाली की,”तुझ्या वडिलांची शेती माझ्या नावावर करून द्या” असे म्हटले असता फिर्यादी म्हणाला की,”सदर जमीन मी तुझ्या नावावर करून देणार नाही” असे फिर्यादिस त्याचा राग आल्याने आरोपी चा मुलगा साईनाथ पवार व राहुल पवार यांनी त्यास लाकडी काठ्यांनी पाठीवर हातावर डोक्यावर व उजव्या डोळ्यावर मारहाण करून जखमी केले आहे.तसेच फिर्यादीची पत्नी शोभा पवार हिने लाथा बुक्यांनी मारहाण केली आहे.

सदरचे सविस्तर वृत्त असे बऱ्याच वेळा बायका नवऱ्याने मारहाण केली असल्याची तक्रारी करतात पण कोपरगाव तालुक्यातील पढेगाव येथील अफलातून तक्रार कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात दाखल झाली असून याची तालुक्यात चवदार चर्चा सुरु आहे.यापूर्वी कोपरगाव शहरात राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांची अशीच तक्रार गतवर्षी दाखल झाली होती.त्यानंतर हा तऱ्हेवाईक गुन्हा दाखल झाला आहे.

सदर गुन्ह्यात फिर्यादी मोहन पवार व आरोपीची पत्नी शोभा मोहन पवार व मुलगा साईनाथ मोहन पवार,राहुल मोहन पवार यांच्यात जमीन नावावर करून देण्यावरून वाद आहे.दि.१८ मे रोजी सकाळी ०९ वाजता फिर्यादी नवरा घरासमोर असताना त्याची पत्नी शोभा पवार फिर्यादिस म्हणाली की,”तुझ्या वडिलांची (सासऱ्याची) शेती माझ्या नावावर करून द्या” असे म्हटले असता फिर्यादी म्हणाला की,”सदर जमीन मी तुझ्या नावावर करून देणार नाही” असे फिर्यादिस त्याचा राग आल्याने आरोपीचा मुलगा साईनाथ पवार व राहुल पवार यांनी फिर्यादिस लाकडी काठ्यांनी पाठीवर हातावर डोक्यावर व उजव्या डोळ्यावर मारहाण करून जखमी केले आहे.तसेच फिर्यादीची पत्नी शोभा पवार हिने लाथा बुक्यांनी मारहाण करून फिर्यादीच्या मुलांनी त्यास वाईट साईट शिवीगाळ करून,”तुम्ही माझ्या नावावर शेती केली नाही तर तुला आणि तुझ्या आईवडिलांना ठार मारून टाकू” अशी धमकी दिली आहे.या प्रकरणी फिर्यादीने कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.या गुन्ह्याबाबत तालुक्यात उलटसुलट चर्चा सुरु आहे.

कोपरगाव तालुका पोलीसांनी या आरोपी विरुद्ध आपल्या दप्तरी गु.र.क्रं.१७७/२०२२ भा.द.वि.कलम ३२४,३२३,५०४,५०६,३४ प्रमाणे दाखल केला आहे.पुढील तपास पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव यांचे मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार अशोक गवसने हे करीत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close