जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
गुन्हे विषयक

ट्रॅक्टरच्या अपघातात मुलगी ठार,कोपरगावात गुन्हा दाखल

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव तालुक्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या तीळवणी उपबाजारात आज सकाळी १०.३० वाजेच्या सुमारास कांद्याचा ट्रॅक्टर (क्रं.एम.एच.३२ ए.५८५२)हा पाठीमागे दोन चाकी ट्रेलर जोडलेला असताना आरोपी चालक बाबासाहेब वाल्मिक शिंदे याने अविचाराने चालवून त्या गावातील तरुणी कु.संगीता मगन पगारे (वय-२४) हिच्या मृत्यूस कारणीभूत झाल्या प्रकरणी कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात फिर्यादी शिला पोपट पगारे (वय-३२) यांनी गुन्हा दाखल केला आहे.त्यामुळे कोपरगाव तालुक्यात खळबळ उडाली आहे.

आज सकाळी १०.३० वाजता वरील आरोपी बाबासाहेब वाल्मिक शिंदे याने आपल्या ताब्यातील वरील क्रमांकाचा ट्रॅक्टर हयगईने चालवून सदर अविवाहित मुलीच्या मृत्यूस कारणीभूत झाला आहे.या प्रकरणी मयत मुलीची भावजय शिला पगारे हिने आज सायंकाळी ०६.५२ वाजेच्या सुमारास या प्रकरणी आरोपी बाबासाहेब शिंदे याचे विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

सदरचे सविस्तर वृत्त असे की,फिर्यादी महिलेने आपल्या फिर्यादीत म्हटले आहे की,”आपण व आपली नणंद दोघी तीळवणी-शिरसगाव येथील उपबाजारात कांदा व्यापाऱ्याकडे मंजुरीने काम करत असताना आज सकाळी १०.३० वाजता वरील आरोपी बाबासाहेब वाल्मिक शिंदे याने आपल्या ताब्यातील वरील क्रमांकाचा ट्रॅक्टर हयगईने चालवून सदर अविवाहित मुलीच्या मृत्यूस कारणीभूत झाला आहे.या प्रकरणी मयत मुलीची भावजय शिला पगारे हिने आज सायंकाळी ०६.५२ वाजेच्या सुमारास या प्रकरणी आरोपी बाबासाहेब शिंदे याचे विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.या प्रकरणी आधी अकस्मात मृत्यू दाखल अकरण्यात आला होता.मात्र कोपरगाव ग्रामीण रुग्णालयांच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांचा अहवाल आल्यावर या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.मृत्यू झालेली मुलगी हि कर्णबधिर असल्याची माहिती हाती आली आहे.त्यामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
कोपरगाव तालुका पोलिसानी या प्रकरणी आपल्या दप्तरी गु.र.क्रं.९०/२०२२ भा.द.वि.कलम ३०४(अ),२७९ मोटार वाहन कायदा कलम १८४ प्रमाणे आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.पुढील तपास पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव यांचे मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार ए.व्ही.गवसने हे करीत आहेत.

जाहिरात-9423439946

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Close
Close