जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

कोपरगावातील…रस्त्याचे काम रेंगाळले,व्यापाऱ्यांत संताप

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव शहरातील दळणवळणासाठी अत्यंत महत्वाचा ठरणारा धारणगाव रस्त्याच्या उदघाटनाला प्रस्थापित नेत्यांनी घाई केली मात्र सदरचे काम तीन महिने उलटूनही अद्याप प्रगतीपथावर न गेल्याने या रस्त्यालगत असलेल्या व्यापाऱ्यांच्या आस्थापनेवर प्रतिकूल परिणाम होत असून अपघातांची मालिका वाढल्याने सदरचा रस्ता त्वरित करावा अशी मागणी येथील कोपरगाव व्यापारी संघर्ष समितीचे जेष्ठ कार्यकर्ते उमेश धुमाळ यांनी मुख्याधिकारी शांताराम गोसावी यांना समक्ष भेटून केली आहे.

“धारणगाव रस्त्याचे काम सुरू होऊन तो संबंधित ठेकेदाराने हा रस्ता खोदून ठेवला आहे.त्यामुळे रस्त्याचा निम्मा भाग सखल तर निम्मा भाग उंच बनल्याने वाहनांना वर्दळीसाठी अडचणींचा ठरला आहेतर व्यापाऱ्यांचे आर्थिक नुकसान होत आहे त्यामुळे त्याचे काम तातडीने करावे”-उमेश धुमाळ,जेष्ठ कार्यकर्ते, कोपरगाव व्यापारी संघर्ष समिती.

कोपरगाव नगर परिषद हद्दीतील २८ रस्त्यांच्या विकासाचे मोठे महाभारत घडले होते.तत्कालीन नगराध्यक्ष विजय वहाडणे यांना या कामाचे स्रेय मिळू नये म्हणून सत्ताधारी गटाने देव पाण्यात बुडवून ठेवले होते.ते करूनही काम होणार म्हटल्यावर त्यांनी जिल्हाधिकारी यांचेकडे अपील केले होते.जिल्हाधिकाऱ्यांनी हिरवा कंदील दिल्यावर त्यांनी त्या निकाला विरोधात त्यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात धाव घेतली होती.मात्र तत्कालीन नगराध्यक्ष विजय वहाडणे यांनी,”शहरातील विकास कामाच्या या खोड्यामुळे तुमची बदनामी होत आहे त्यामुळे उच्च न्यायालयातील खटले मागे घ्यावे” या सहज बोलण्याला गांभीर्याने घेऊन आपली घसरलेली गाडी सावरण्यासाठी औरंगाबाद खंडपीठातील याचिका मागे घेतली होती.त्यामुळे या रस्ते विकासाचा मार्ग खुला झाला होता.त्या नंतर कोपरगावचे आमदार आशुतोष काळे व तत्कालीन नगराध्यक्ष विजय वहाडणे यांनी या कामांच्या उदघाटनांचा धडाका लावला होता.बरीच कामे निकाली निघाली हे खरे असले तरी अद्याप बरीच कामे प्रलंबित आहे.त्यात हा धारणगाव रस्ता महत्वपूर्ण मानला जातो.मात्र त्याचे काम सुरू होऊन तो संबंधित ठेकेदाराने हा रस्ता खोदून ठेवला आहे.त्यामुळे रस्त्याचा निम्मा भाग सखल तर निम्मा भाग उंच बनल्याने वाहनांना वर्दळीसाठी अडचणींचा ठरला आहे.शिवाय या रस्त्यालगत मोठ्या प्रमाणावर व्यापारी आस्थापना आहेत.त्यामुळे ग्राहकांना त्यांच्या आस्थापणात येण्यात अडचणी येत असल्याने ग्राहक या आस्थापणात येण्यास जीव धोक्यात घालण्यास धजावत नाही.त्यामुळे या रस्त्यालगत असलेल्या दुकानदारांना मंदीचा सामना करावा लागत आहे.त्यामुळे या ठेकेदार व नगरपरिषदेविरुद्ध या व्यापाऱ्यांचा मोठा रोष आहे.त्यामुळे व्यापारी संघर्ष समितीचे जेष्ठ कार्यकर्ते उमेश धुमाळ व सहकाऱ्यांनी कोपरगाव नगरपरिषदेचे मुख्याधिकारी शांताराम गोसावी यांची भेट घेऊन या रस्त्याचे काम त्वरित करण्याची मागणी केली आहे.व या मागणीची दखल घेतली नाही तर आपण आंदोलन करू असा इशाराही उमेश धुमाळ यांनी नुकताच दिला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close