कोपरगाव तालुका
गंगागिरी महाराज महाविद्यालयाच्या विकासात महत्वपूर्ण योगदान द्यावे-आवाहन

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
माजी विद्यार्थ्यांनी श्री सद्गुरू गंगागिरी महाराज महाविद्यालयाच्या विकासात महत्वपूर्ण योगदान द्यावे असे आवाहन महाविद्यालय विकास समितीचे सदस्य व महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी व राष्ट्रवादीचे जिल्हा कार्याध्यक्ष संदीप वर्पे यांनी केले आहे.
“कोपरगाव येथील एस.एस.जी.एम महाविद्यालयाने आंतरराष्ट्रीय स्तरावर विद्यार्थी घडविले असून माजी विद्यार्थ्यांची फार मोठी परंपरा या महाविद्यालयाला आहे.याच महाविद्यालयाच्या संस्काराची शिदोरी घेऊन आपली वाटचाल सुरु झाली व आपण जीवनात यशस्वी झालो आहे”-महेंद्र काले,आदर्श जि.प.सदस्य पुरस्कार प्राप्त नाशिक जि.प.सदस्य.
कोपरगाव येथील श्री सदगुरु गंगागीर महाराज महाविद्यालयामध्ये माजी विद्यार्थी मेळावा आयोजित केला होता त्या वेळी ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.रमेश सानप हे होते.
सदर प्रसंगी टी.व्ही.नाईन मराठीचे रिपोर्टर संदीप बर्गे,आदर्श जि.प.सदस्य पुरस्कार प्राप्त नाशिक जि.प.सदस्य व महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी महेंद्र काले,नॅशनल कॉलेज नाशिक येथील प्राचार्य डॉ.सुरेश नहिरे,एक्झीक्यूटिव्ह इंजिनीअर बी.एल.देवकर,प्रा.व्ही.बी.गायकवाड,योजना पोतदार मॅडम,महाविद्यालयाच्या कला विभागाचे उपप्राचार्य डॉ.सुभाष रणधीर,वाणिज्य विभागाचे उपप्राचार्य डॉ.विजय निकम,विज्ञान विभागाचे उपप्राचार्य प्रा.ए.के.देशमुख,जुनिअर विभागाचे उपप्राचार्य प्रा.रामभाऊ गमे,कार्यालयीन अधीक्षक सुनील गोसावी आदींसह माजी विद्यार्थी तसेच महाविद्यालयातील शिक्षक,शिक्षकेतर कर्मचारी बहुसंख्येने उपस्थित होते.
सदर प्रसंगी पुढे बोलताना ते म्हणाले की,”ज्या महाविद्यालयाच्या संस्काराने आयुष्याला दिशा मिळाली त्या महाविद्यालयाविषयी माजी विद्यार्थ्यांचे प्रेम नेहमीच उचंबळून येते.माजी विद्यार्थी मेळाव्याच्या निमित्ताने तर या प्रेमाला उधान येत असते.खरोखरच एस.एस.जी.एम.महाविद्यालयातून अनेक विद्यार्थ्यांनी आपले भविष्य घडविले आहे.आज हे विद्यार्थी विविध क्षेत्रात आपल्या कर्तुत्वाचा ठसा उमटवत आहेत.ही बाब महाविद्यालयाच्या दृष्टीने भूषणावह आहे.महाविद्यालयाने माजी विद्यार्थ्यांच्या सूचनांची अमलबजावणी करीत भविष्यात व्यापक स्वरुपात मेळाव्यांचे आयोजन करणे गरजेचे आहे.
सदर प्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.रमेश सानप म्हणाले की,”स्पर्धात्मक युगात विविध आव्हानांचा सामना करीत महाविद्यालयाची वाटचाल सुरु असून या प्रगतीशील वाटचालीत माजी विद्यार्थी एक महत्वाचा घटक आहेत.
सदर प्रसंगी नॅशनल कॉलेज नाशिक येथील प्राचार्य डॉ.सुरेश नहिरे,एक्झीक्यूटिव्ह इंजिनीअर बी.एल.देवकर,प्रा.व्ही.बी.गायकवाड,योजना पोतदार मॅडम यांनीही आपल्या भावना व्यक्त करीत महाविद्यालयाविषयी कृतज्ञता व्यक्त केली.
सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक माजी विद्यार्थी समितीचे अध्यक्ष प्रा.डॉ.एन.एम.चव्हाण यांनी केले.सुत्रसंचलन प्रा.डॉ.माधव यशवंत यांनी केले. तर उपस्थितांचे आभार प्रा.यु.बी.गवळी यांनी मानले आहे.