गुन्हे विषयक
कंटेनरचे कुलूप तोडून चोरी,कोपरगावात गुन्हा दाखल

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव तालुक्यातून समृद्धी महामार्गाचे काम वेगाने सुरु असून या ठिकाणी जेऊर-कुंभारी शिवारात एका कंटेनर मध्ये ठेवलेले दोन इलेक्टरीक वेल्डिंगचे मशीन,दोन ग्रॅण्डर मशीन,एक कटिंग मशीन व तीन हॅलोजन बल्ब असे सुमारे ४१ हजार रुपये किमतीचे सामान अज्ञात चोरट्याने लबाडीच्या इराद्याने चोरून नेले असल्याची फिर्याद अभियंता हिशाम शौकत अली रा.हिशाम,कंनीपरम,ए.के.पंलकोट परंब,कनीपरंब पी.अ.कोशिकोट,ह.मु.जेऊर कुंभारी यांनी कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात दाखल केल्याने खळबळ उडाली आहे.
जेऊर कुंभारी शिवारात दि.०९ मार्च रोजी पहाटे ०३ वाजेच्या सुमारास अज्ञातच चोरट्याने त्यावर डल्ला मारला आहे.त्यात ४० हॉर्स पॉवरचे १४ हजार रुपये किमतीचे जुने वापरते दोन इलेक्टरीक वेल्डिंगचे मशीन,०३ हजार रुपये किमतीचे दोन ग्रॅण्डर मशीन,०४ हजार रुपये किमतीचे एक कटिंग मशीन व २० हजार रुपये किमतीचे तीन हॅलोजन बल्ब असे सुमारे ४१ हजार रुपये किमतीचे सामान अज्ञात चोरट्याने लबाडीच्या इराद्याने चोरून नेले आहे.
महाराष्ट्र ही भारताची बळकट राज्य अर्थव्यवस्था म्हणून कायम राहिली आहे.व्यापार चळवळीतील संधींच्या वाढीसाठी महाराष्ट्रने देशाच्या विकासास नेहमीच हातभार लावला आहे.राज्याच्या आर्थिक आणि सामाजिक-व्यवसायिक दाव्याला बळकटी देण्यासाठी या मोहिमेमध्ये,महाराष्ट्र राज्य भाजप सरकारने ‘महाराष्ट्र समृद्धी महामार्ग’ या नावाने,७१० कि.मी. लांबीचा नागपूर-मुंबई शीघ्र संचार ग्रीनफील्ड द्रुतगती मार्ग हा महत्वाकांक्षी प्रकल्प सुरू केला आहे.तो आता अंतिम टप्यात आला असून या ‘महाराष्ट्र दिनाचे’ दिवशी तो लोकार्पण करण्याचा राज्य व केंद्र सरकारचा मनोदय आहे.मात्र कोपरगाव तालुक्यात या कामास वेग देण्यास सरकारला अपयश आले आहे.विशेषतः कोपरगाव तालुक्यात याची गती लक्षणीय कमी आहे.त्याची जबाबदारी कोणीही घ्यायला तयार नाही.तरीही आगामी काळात महाराष्ट्र दिनी हा प्रकल्प नागपूर ते शिर्डी दरम्यान सुरु करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे.मात्र या रस्त्यावरील ठेकेदार यांना काम करताना चोऱ्यामाऱ्यांची मोठी अडचण तयार झाली आहे.अशीच घटना कोपरगाव तालुक्यात घडली असून या ठिकाणी इलेक्टरीक वेल्डिंगचे काम करणारा आंध्र प्रदेश मधील वरील गावचा अभियंता काम करत असून त्याचे कामाचे साहित्य त्याने नजीकच्या उभ्या असलेल्या कंटेनर मध्ये ठेऊन देऊन त्यास कुलूप लावले असताना त्या ठिकाणी दि.०९ मार्च रोजी पहाटे ०३ वाजेच्या सुमारास अज्ञातच चोरट्याने त्यावर डल्ला मारला आहे.त्यात ४० हॉर्स पॉवरचे १४ हजार रुपये किमतीचे जुने वापरते दोन इलेक्टरीक वेल्डिंगचे मशीन,०३ हजार रुपये किमतीचे दोन ग्रॅण्डर मशीन,०४ हजार रुपये किमतीचे एक कटिंग मशीन व २० हजार रुपये किमतीचे तीन हॅलोजन बल्ब असे सुमारे ४१ हजार रुपये किमतीचे सामान अज्ञात चोरट्याने लबाडीच्या इराद्याने चोरून नेले आहे.या प्रकरणी त्यांनी कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात अज्ञात इसमा विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.कोपरगाव शहर पोलिसांनी या प्रकरणी आपल्या दप्तरी गु.क्रं.५७/२०२२ भा.द.वि.कलम ४५७,३८० प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.पुढील तपास पोलीस निरीक्षक वासुदेव देसले यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक श्री ढाकणे हे करीत आहेत.