जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

कोपरगाव शहराला विकासापासून वंचित ठेवले-..या नेत्यांचा आरोप

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव शहराला विकासाच्या वाटेवर आणण्यासाठी येणाऱ्या कोपरगाव नगरपरिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी कॉंग्रेसचा नगराध्यक्ष होणे गरजेचे असून त्यासाठी राष्ट्रवादीच्या जास्तीत जास्त नगरसेवकांना निवडून द्या असे आवाहन श्री साईबाबा संस्थानच्या विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष ना. आशुतोष काळे यांनी कोपरगाव येथे एका कार्यक्रमात बोलताना केले आहे.

“गत विधानसभा निवडणुकीत मला निवडून देवून एक जबाबदारी तुम्ही पार पाडली.दोन वर्षात कोरोना संकट असतांना देखील मतदार संघाच्या विकासासाठी व कोपरगाव शहराच्या विकासासाठी देखील कोट्यावधी रुपयांचा निधी दिला आहे.मात्र दुर्दैवाने शहर विकासाच्या बाबतीत राजकारण करून शहरातील नागरिकांना विकासापासून वंचित ठेवल्यामुळे कोपरगाव शहर विकासाच्या बाबतीत खूप मागे पडले आहे”-ना.आशुतोष काळे,कोपरगाव.

कोपरगाव नगरपरिषदेची निवडणूक आगामी काळात संपन्न होणार आहे.या पार्श्वभुमीवर शहर संघटन वाढविण्यास राष्ट्रवादीने प्रारंभ केला आहे.कोपरगाव शहरातील गजानननगर मध्ये राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या शाखेचे उदघाटन ना.काळे यांच्या हस्ते पार पडले.त्या प्रसंगी ते बोलत होते.

सदर प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष संदीप वर्पे,महात्मा गांधी जिल्हा प्रदर्शन चॅरिटेबल ट्रस्टचे सचिव धरमचंद बागरेचा,शहराध्यक्ष सुनील गंगूले,नगरसेवक गटनेते विरेन बोरावके,मंदार पहाडे,संदीप पगारे,प्रतिभा शिलेदार,मेहमूद सय्यद,अजीज शेख,राजेंद्र वाकचौरे,गौतम बँकेचे संचालक सुनील शिलेदार,युवक शहराध्यक्ष नवाज कुरेशी,महिला जिल्हा सरचिटणीस रेखा जगताप,विद्यार्थी तालुकाध्यक्ष निखील डांगे,शहराध्यक्ष कार्तिक सरदार,रमेश गवळी,फकीर कुरेशी,कृष्णा आढाव,दिनकर खरे,डॉ.तुषार गलांडे,जावेद शेख,राहुल देवळालीकर,चंद्रशेखर म्हस्के,प्रकाश दुशिंग,रावसाहेब साठे,शाखाध्यक्ष तेजस साबळे,उपाध्यक्ष ललित गोडसे,सहसचिव आमिर शेख,खजिनदार शैलेश कदम,बाळासाहेब रुईकर,अशोक आव्हाटे,वाल्मिक लहिरे,धनंजय कहार,सोनाली बारसे,रूपाली कळसकर,अलका सोनवणे आदींसह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

त्या वेळी पुढे बोलताना ते म्हणाले की,”२०१९ च्या विधानसभा निवडणुकीत मला निवडून देवून एक जबाबदारी तुम्ही पार पाडली.दोन वर्षात कोरोना संकट असतांना देखील मतदार संघाच्या विकासासाठी व कोपरगाव शहराच्या विकासासाठी देखील कोट्यावधी रुपयांचा निधी दिला आहे.मात्र दुर्दैवाने शहर विकासाच्या बाबतीत राजकारण करून शहरातील नागरिकांना विकासापासून वंचित ठेवल्यामुळे कोपरगाव शहर विकासाच्या बाबतीत खूप मागे पडले असल्याचे ते शेवटी म्हणाले आहे.
यावेळी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी मोटारसायकल रॅली काढली होती.या रॅलीमध्ये ना.काळे यांनी देखील सहभागी होवून कार्यकर्त्यांचा उत्साह वाढविला आहे.
यावेळी भाजप शहर सरचिटणीस शैलेश साबळे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला.त्यांचे ना.काळे यांनी स्वागत करून शुभेच्छा दिल्या आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close