जाहिरात-9423439946
गुन्हे विषयक

कोपरगाव नजीक अपघात,विद्यार्थी ठार,पिता जखमी

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव तालुक्यातील सैनिकी स्कूल येथे मुलास वसतिगृहात सोडविण्यासाठी होंडा ऍक्टिव्हा (क्रं.एम.एच.१५ जी.क्यु.५३१८) या दुचाकीवरून जात असताना दि.०५ फेब्रुवारी रोजी दुपारी १२.४५ वाजेच्या सुमारास समोरून येणाऱ्या लाल रंगाच्या आयशर टेम्पो (क्रं.एम.एच.१० झेड ३३५०) याने जोराची धडक दिल्याने त्यात आपला मुलगा सुशांत गोरख गांगुर्डे (वय-१३) रा.शंकर नगर विंचुर ता.निफाड हा व आपण गंभीर रित्या जखमी झालो होतो मात्र उपचारा दरम्यान तो लोणी येथील रुग्णालयात नुकताच मयत झाला असल्याही फिर्याद मुलाचा पिता गोरख खंडू गांगुर्डे (वय ४३) यांनी कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात दाखल केली आहे.त्यामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

संकल्पित छायाचित्र

कोपरगावच्या दिशेने वरील क्रमांकाचा एक लाल रंगाचा आयशर टेम्पो हा भरधाव वेगाने जात होता.त्याने आम्हाला येसगाव शिवारात काळे पेट्रोल पंपाचे पूर्वेस चुकीच्या बाजूने येऊन जोराची धडक मारली.परिणाम स्वरूप आम्ही गाडीवरून खाली कोसळलो ‘त्या’ अपघातात माझ्या मुलाच्या उजव्या बाजूस खांद्याजवळ व व खांद्यापासून कोपरापर्यंत मोठ्या प्रमाणावर मुका मार लागून त्यास खरचटले होते.’तो’या घटनेत जागीच बेशुद्ध झाला होता.उपचारा दरम्यान त्याचा मृत्यू झाला आहे.

सदरचे सविस्तर वृत्त असे की,फिर्यादी मुलाचा पिता गोरख गांगुर्डे हे निफाड तालुक्यातील विंचुर येथील रहिवासी असून ते पत्नी,मयत मुलगा सुशांत,अन्य एक मुलगा साई,आई यशोदा वडील खन्डु गांगुर्डे आदी एकत्र राहतात.मयत मुलगा सुशांत गांगुर्डे यास कोपरगाव येथील संजीवनी सैनिकी स्कूल येथे शिक्षणासाठी वसतिगृहात सोडण्यासाठी ते दि.०५ फेब्रुवारी रोजी दुपारी १२.४५ वाजता जात असताना समोरून कोपरगावच्या दिशेने वरील क्रमांकाचा एक लाल रंगाचा आयशर टेम्पो हा भरधाव वेगाने जात होता.त्याने आम्हाला येसगाव शिवारात काळे पेट्रोल पंपाचे पूर्वेस चुकीच्या बाजूने येऊन जोराची धडक मारली.परिणाम स्वरूप आम्ही गाडीवरून खाली कोसळलो ‘त्या’ अपघातात माझ्या मुलाच्या उजव्या बाजूस खांद्याजवळ व व खांद्यापासून कोपरापर्यंत मोठ्या प्रमाणावर मुका मार लागून त्यास खरचटले होते.’तो’या घटनेत जागीच बेशुद्ध झाला होता.या अपघातात मलाही उजव्या हातास,खांद्यास.उजव्या पायाचे मांडीला मुक्का मार लागला होता.
दरम्यान या अपघातात आमच्या दुचाकीची मोठे नुकसान झाले होते.या घटनेनंतर आम्हाला नजीकच्या नागरिकांनी खाजगी वाहनाने लोणी येथील प्रवरा ग्रामीण रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले होते.दरम्यान उपचारा दरम्यान आपल्या मुलाचे दि.०९ फेब्रुवारी रोजी दुपारी १२.३० वाजता निधन झाले आहे.
या घटने नंतर आपण या अपघात घडविणाऱ्या वाहनाची चौकशी केली असता सदर टेम्पो हा आयशर असून ‘तो’ लाल रंगाचा होता.व त्याचा क्रमांक एम.एच.१० झेड ३३५० असल्याची माहिती आपल्या एका ओळखीच्या समाधान चव्हाण यांनी सांगितले होते.मात्र आपण दुःखात असल्याने उशिरा हा गुन्हा दाखल केला आहे.सदर टेम्पो चालकाने चूकीच्या बाजूने आपल्या ताब्यातील वाहन चालवून तो आपल्या मुलाच्या मृत्यूस कारणीभूत ठरला असल्याचा आरोप मुलाच्या पित्याने केला आहे.व अपघाता नंतर तो कुठलीही खबर न देता फरार झाला आहे.

या प्रकरणी कोपरगाव तालुका पोलिसांनी आपल्या दप्तरी गु.र.क्रं.५६/२०२२ भा.द.वि.कलम ३०४(अ) २७९,३३७,३३८,४२७,मोटार वाहन कायदा कलम १८४,१३४,(अ)(ब) अन्वये आरोपी टेम्पो चालक याचे विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.पुढील तपास पोलिस निरीक्षक दौलतराव जाधव यांचे मार्गदर्शनाखाली पो.हे.कॉ. अशोक आंधळे हे करीत आहेत.

जाहिरात-9423439946

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close