जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
गुन्हे विषयक

हळदीच्या कार्यक्रमातच हाणामारी,कोपरगावात चार जखमी

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव शहरात हळदीच्या कार्यक्रमातच मित्र जमा झाले असता त्यातील काहींनी जुने भांडणाचे कारण उकरून काढून तुफान हाणामारी केली असून त्यात विटांच्या तुकड्याची वापर करण्यात आला आहे.त्यात जावेद रफिक पठाण (वय-२४) लक्ष्मीनगर याने कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून या हाणामारीत रफिक पठाण (वय-२४),समीर अल्ताब मणियार,सादिक शकील सय्यद,सादिक शकील सय्यद हे चौघे जखमी झाले आहे.यात आरोपी सलमान आयुब पठाण,शाहरुख लतीब कुरेशी,सोहेल मस्जिद कुरेशी,अस्लम महेबुब कुरेशी,शाहिद शफीक सर्व रा.संजयनगर या पाच आरोपीवर गुन्हा दाखल झाला आहे.

कोपरगाव शहरातील संजयनगर व लक्ष्मीनगर,गांधीनगर हे भाग संवेदनशील मानले जातात.किरकोळ कारणावरून या भागात सामाजिक शांतता भंग पावण्याच्या घटना वारंवार घडत असतात अशीच घटना नुकतीच दि.२० नोव्हेंबर रोजी रात्री ०९.३० वाजेच्या सुमारास घडली आहे.या बाबत फिर्यादी जावेद रफिक पठाण या मजुराने गुन्हा दाखल केला आहे.त्यात चार जण जखमी झाले आहे.

सदरचे सविस्तर वृत्त असे की,कोपरगाव शहरातील संजयनगर व लक्ष्मीनगर,गांधीनगर हे भाग संवेदनशील मानले जातात.किरकोळ कारणावरून या भागात सामाजिक शांतता भंग पावण्याच्या घटना वारंवार घडत असतात अशीच घटना नुकतीच दि.२० नोव्हेंबर रोजी रात्री ०९.३० वाजेच्या सुमारास घडली आहे.या बाबत फिर्यादी जावेद रफिक पठाण या मजुराने गुन्हा दाखल केला आहे.

त्यात त्याने म्हटले आहे की,”आपण लक्ष्मीनगर येथील रहिवासी असून आपण आपल्या मित्रांसमवेत संजयनगर येथे हळदीच्या कार्यक्रमाला गेलो होतो.यातील काही आरोपीनी मागील भांडणाचे कारण उकरून काढले व आपल्याला व आपले मित्र यांना लाथा बुक्यांनी मारहाण केली तसेच आरोपी सलमान आयुब पठाण,शाहरुख लतीब कुरेशी,सोहेल मस्जिद कुरेशी,अस्लम महेबुब कुरेशी,शाहिद शफीक सर्व रा.संजयनगर यांनी सदर ठिकाणी विटांचे तुकडे पडलेले होते ते उचलून फेकून मारले आहे.व शिवीगाळ केली असून जीवे मारण्याची धमकी दिली आहे.त्यात आपण व आपले मित्र जखमी झाले आहे.या प्रकरणी फिर्यादीने कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.घटनास्थळी पोलीस उपनिरीक्षक रोहिदास ठोंबरे व तपासी अधिकारी यांनी भेट देऊन स्थितीवर नियंत्रण मिळवले होते.

कोपरगाव शहर पोलिसांनी आपल्या दप्तरी गु.र.क्रं.३४६/२०२१ भा.द.वि.कलम ३२४,३२३,१४३,१४७,५०४,५०६ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.पुढील तपास पोलिस निरीक्षक वासुदेव देसले यांचे मार्गदर्शनाखाली पो.हे.कॉ.डी.आर.तिकोणे हे करीत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close