जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
गुन्हे विषयक

आजाराला कंटाळून शिक्षकाची आत्महत्या,कोपरगावात अकस्मात मृत्यूची नोंद

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव तालुक्यातील कोकमठाण ग्रामपंचायत हद्दीतील रहिवासी असलेले मात्र कोपरगाव लायन्स क्लब मूक बधिर विद्यालयातील शिक्षक विशाल चंद्रकांत जपे यांनी आपल्या असाध्य आजाराला कंटाळून नुकतीच नगर-मनमाड मार्गावरील गोदावरी नदी वरील पुलावरून उडी मारून आत्महत्या केली असल्याही धक्कादायक घटना उघड झाली आहे.त्यामुळे कोकमठाणसह तालुक्यातील शैक्षणिक क्षेत्रात खळबळ उडाली आहे.

दरम्यान याबाबत मिळालेल्या एका माहितीनुसार मयत शिक्षक विशाल जपे हे काही असाध्य आजाराने त्रस्त होते.व त्यातून त्यांना नैराश्य आले होते.त्यातून त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलल्याचे बोलले जात आहे.या प्रकरणी त्यांच्या घरी एक मृत्यूपूर्व चिट्ठी सापडल्याचे समजत आहे.त्यात,”मला झोप येत नाही,त्यामुळे आपण आपले जीवन संपवून टाकत आहे” शेवटी कुटुंबाची माफी मागितली असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.त्याला तपासी अधिकारी यांनी दुजोरा दिला आहे.दरम्यान या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.हि चिट्ठी इंगजी व मराठीत लिहिली आहे.

वर्तमानात १५ ते २५ वर्षांमधील वयोगटांत आत्महत्येचे प्रमाण वाढत चालले आहे ही चिंतेची बाब आहे.या वयोगटात अभ्यासाचा ताण,परीक्षेत अपयश आणि प्रेमभंग ही तीन प्रमुख कारणे आहेत. आणखी एक म्हणजे जगाच्या तुलनेच भारतात स्त्रियांमधील आत्महत्येचे प्रमाण जास्त आहे.सामाजिकदृष्टय़ा दुय्यम स्थान आणि हुंडाबळी ही दोन कारणे यासाठी सांगितली जातात.रागीट,आततायी,हट्टी,टोकाचा परफेक्शनिस्ट आणि अप्रगल्भ असलेल्या व्यक्तींमध्ये आत्महत्येची वृत्ती जास्त असते.मानसिक आजारांमध्येही आत्महत्या घडू शकते.याचे सर्वात जास्त प्रमाण नैराश्यात असते.अशीच दुर्दैवी घटना कोपरगाव शहरानजीक असलेल्या गोदावरी पुलावर घडली आहे.

सदरचे सविस्तर वृत्त असे की,कोपरगाव शहराच्या ईशान्येस साधारण एक कि.मी.अंतरावर असलेल्या नगर-मनमाड राज्य मार्गावर इंग्रज राजवटीत बांधलेला मोठा पूल असून त्या ठिकाणी नदी पात्रात काल सायंकाळी सुमारे सात वाजेच्या सुमारास कोपरगाव शहर पोलिसांना एका इसमाचे प्रेत तरंगताना आढळून आले असल्याची माहिती कोपरगाव नजीक असललेल्या मूक बधिर विद्यालयातील काही शिक्षकांनी दिली होती.

त्यानुसार कोपरगाव शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक वासुदेव देसले यांनी आपल्या सहकाऱ्यांना घेऊन घटनास्थळी धाव घेतली असता त्या ठिकाणी त्यास दुजोरा मिळाला होता.त्यांनी तातडीने आपल्या काही पोहता येणाऱ्या सहकाऱ्यांना पाचारण केले होते.त्या ठिकाणचे प्रेत वर काढून घेतले असता ते मूक बधिर विद्यालयातील शिक्षक विशाल चंद्रकांत जपे (वय-४०) आहे. यांचेच असल्याचे निष्पन्न झाले होते.त्या ठिकाणी पोलिसानी घटनास्थळाचा पंचनामा केला होता.व आपल्या दप्तरी खबर देणार मयताचे बंधू जपे यांनी दिलेल्या अकस्मात मृत्यू नोंद क्रं.६३/२०२१ सी.आर.पी.सी.१७४ प्रमाणे नोंद केली होती.पुढील तपास पोलीस निरीक्षक वासुदेव देसले यांचे मार्गदर्शनाखाली पो.हे.कॉ.सचिन शेवाळे हे करीत आहेत.मयताच्या पच्छात पत्नी,आई,वडील,एक मुलगा असा परिवार असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close