जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

कोपरगावात दोन मान्यवरांचा सत्कार संपन्न

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगावचे आ.आशुतोष काळे व भारत संचार निगमचे नूतन संचालक अ‍ॅड.रवींद्र बोरावके यांचा कोपरगाव पिपल्स बँकेच्या वतीने नुकताच मोठ्या उत्साहात सत्कार करण्यात आला आहे.

“भारत संचार निगम या केंद्रीय कंपनीमध्ये पंतप्रधान कार्यालयातून आपली शिफारस होऊन राष्ट्रपतींनी निवड केली आहे.त्यांनी जो विश्वास आपल्यावर टाकला आहे तो निश्चितच पूर्ण करु व बीएसएनएल सेवा आता सॅटेलाईट मार्फत जोडले जाणार त्यामुळे बीएसएनएलचे टेलिफोन आता पुन्हा घराघरात वाजणार आहे’-अड.रवींद्र बोरावके,संचालक भारत संचार निगम.

कोपरगांव पिपल्स को-ऑप बँकेचे वतीने आ.आशुतोष काळे यांची राज्य सरकारने शिर्डी येथील श्री साईबाबा संस्थान व्यवस्थेच्या अध्यक्षपदी निवड केल्याबद्दल तर कोपरगाव येथील भाजपचे प्रदेश समिती सदस्य अ‍ॅड.रविंद्र बोरावके यांची भारत संचार निगम लि.च्या संचालकपदी केंद्र सरकारने नुकतीच निवड केल्याबद्दल सत्कार समारंभ नुकताच पिपल्स बँकेचे सभागृहात मोठ्या उत्साहात पार पडला आहे.

सदर प्रसंगी बँकेचे अध्यक्ष सत्येन मुंदडा यांनी प्रास्ताविक करून त्यांचे स्वागत केले.तर बँकेचे जेष्ठ संचालक कैलास ठोळे यांनी भारतातील जगप्रसिद्ध असलेले तीर्थक्षेत्र श्री साईबाबा संस्थान हे दोन नंबरचे तीर्थक्षेत्र समजले जाते अशा श्री साईबाबा संस्थानवर आ.काळे यांची झालेली निवड तसेच अ‍ॅड.रवींद्र बोरावके यांची भारत संचार निगम लि.या केंद्रीय कंपनी मध्ये संपूर्ण भारतामधून महाराष्ट्रातील या कोपरगांव शहरातील नागरिकास बहुमान मिळून संचालकपदी झालेली निवड निश्चित कौतुकास पात्र असल्याचे कौतुक केले आहे.

सदर प्रसंगी आ.काळे हे पुढे बोलताना म्हणाले की,” पक्षाने आपल्या कामाचा विचार करून आपल्यावर श्री साईबाबा संस्थानचे अध्यक्षपदाची जबाबदारी दिली आहे. ती साईबाबांच्या कृपेने आपण ती निश्चितच पार पाडू व आपल्या सर्वांचे सहकार्याने संस्थानला प्रगतीकडे घेऊन जाऊ असा विश्वास व्यक्त करून कोपरगांव तालुक्याच्या विकासासाठी शासनाकडून जास्तीत जास्त निधी आणण्या साठी प्रामाणिक प्रयत्न करू असे आश्वासन उपस्थितांना दिले आहे.

उपस्थित मान्यवरांचे पीपल्स बँकेच्या उपाध्यक्ष प्रतिभा शिलेदार यांनी आभार मानले.संचालक डॉ.विजय कोठारी, सुनील कंगले,धरमचंद बागरेचा,कल्पेश शहा, सुनील बंब,यशवंत आबनावे,हेमंत बोरावके,रविंद्र ठोळे, सेवक संचालक विरेश पैठणकर,अशोक पापडीवाल,जनरल मॅनेजर दीपक एकबोटे,असि.जनरल मॅनेजर जितेंद्र छाजेड, विठ्ठल रोठे,सुनील बोरा,कैलास खैरे, सुनील शिलेदार आदी मान्यवर उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close