जाहिरात-9423439946
गुन्हे विषयक

वहानातून इंधन चॊरी,कोपरगावात गुन्हा दाखल

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव शहराच्या उत्तरेस सुमारे दहा कि.मी.अंतरावर असलेल्या येसगाव ग्रामपंचायत हद्दीत असलेल्या नगर-मनमाड महामार्गावर असललेल्या काले यांच्या पेट्रोल पंपानजीक असललेल्या हॉटेल राजस्थान समोर आपली सिमेंटची गाडी उभी करून ठेवली असता दि.२५ सप्टेंबरच्या पहाटे अज्ञात चोरट्याने आपल्या गाडीच्या इंधन टाकीतील सुमारे १७ हजार ५०१ रुपये किमतीचे १८५ लिटर डिझल चोरून केले आहे.या प्रकरणी फिर्यादी आशिष कुमार तोडकरे (वय-२१) रा.वाणेवाडी ता.तुळजापूर जिल्हा उस्मानाबाद यांनी कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केल्याने वाहन धारकात भीतीचे वातावरण पसरले आहे.

येसगाव ग्रामपंचायत हद्दीत याच ठिकाणी पहाटेच्या सुमारास विश्रांतीसाठी थांबलेल्या ट्रक चालकांवर चाकूने हल्ला करून पोबारा केला होता.यात दोन जण गंभीर जखमी झाले होते.त्या गुन्ह्याच्या बातम्यांची शाई वाळते न वाळते तोच त्याच ठिकाणी एक आठवड्यात हि दुसरी घटना घडली आहे.वारंवार होणाऱ्या चोऱ्यांनी चोरट्यांनी पोलिसांना वाकुल्या दाखविण्यास प्रारंभ केला असल्याचे दिसून येत आहे.

कोपरगाव तालुक्यात वर्तमान काळात चोरट्यांनी आपली हाथ की सफाई दाखविण्यास प्रारंभ केला असून गत सप्ताहात येसगाव ग्रामपंचायत हद्दीत याच ठिकाणी पहाटेच्या सुमारास विश्रांतीसाठी थांम्बलेल्या ट्रक चालकांवर चाकूने हल्ला करून पोबारा केला होता.यात दोन जण गंभीर जखमी झाले होते.त्या गुन्ह्याच्या बातम्यांची शाई वाळते न वाळते तोच त्याच ठिकाणी एक आठवड्यात हि दुसरी घटना घडली आहे.वारंवार होणाऱ्या चोऱ्यांनी चोरट्यांनी पोलिसांना वाकुल्या दाखविण्यास प्रारंभ केला असल्याचे दिसून येत आहे.यावर तालुका पोलिसांना आता कडक भूमिका घेण्याची गरज निर्माण झाली आहे.अशीच घटना नुकतीच शनिवार दि.२५ सप्टेंबरच्या रात्री घडली असून या ठिकाणी विश्रांतीसाठी वाणेवाडी ता.तुळजापूर येथील सिमेंट वाहतूक करणारा ट्रक चालक आशिष तोडकर हा आपली गाडी थांम्बवून झोपी गेला असता त्यांना झोपी गेल्याची संधी साधत अज्ञातच चोरट्यांनी दि.२५ सप्टेंबरच्या पहाटे ४.३० ते ०७ वाजेच्या दरम्यान त्यांच्या डिझल टाकीतील इंधन अज्ञात साहित्याच्या जोरावर काढून घेऊन पोबारा केला आहे.सकाळी उठल्यावर त्यांच्या हि बाब लक्षात आली तो पर्यंत चोरट्यांनी पोबारा केला होता.

त्यांनी दि.२६ सप्टेंबर रोजी १.४४ वाजता या प्रकरणी कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दखल केला आहे.घटनास्थळी पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव,सहायक पोलीस निरीक्षक सुरेश आव्हाड यांनी भेट दिली आहे.

कोपरगाव तालुका पोलिसांनी या प्रकरणी आपल्या दप्तरी गु.र.क्रं.३४५/२०२१ भा.द.वि.कलम ३७९ प्रमाणे अज्ञात चोरट्या विरुद्ध गुन्हा दखल केला आहे.पुढील तपास पोलिस निरीक्षक दौलतराव जाधव यांचे मार्गदर्शनाखाली नव्याने दाखल झालेले पोलीस उपनिरीक्षक भरत नागरे हे करीत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close