जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
गुन्हे विषयक

कोपरगाव तालुक्यात कुलूप तोडून चोरी,गुन्हा दाखल

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव तालुक्याच्या वायव्येस साधारण आठ कि.मी.अंतरावर असललेल्या ब्राम्हणगाव ग्रामपंचायत हद्दीत अंबिकानगर येथील रहिवासी असलेल्या विशाल गोपीनाथ कुमावत (वय-३३) यांचे दि.२५ सप्टेंबरच्या रात्री बंद घराचे कुलूप तोडून अज्ञातच चोरट्यांनी त्यांच्या घरातील २० हजार रुपये किमतीचे ७ ग्रॅम वजनाचे जुने व नवीन मणी असलेले सोन्याचे पॅडल व १०० व ५०० नोटा असलेले १ हजार ४०० रूपये असे मिळून २१ हजार ४०० रुपयांचा पोबारा केला आहे.या प्रकरणी कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.त्यामुळे ग्रामीण भागात चोरट्यांची दहशत पसरली आहे.

ब्राम्हणगाव येथील रहिवासी विशाल कुमावत हे शनिवार दि.२५ सप्टेंबर रोजी आपल्या काही कामासाठी बाहेरगावी गेले होते.त्यांचे काम न आटोपल्याने त्यांचे आपल्या घरी रात्री उशिरा येणे झाले नाही.याचा पाळतीवर असलेल्या अज्ञात चोरट्यानी फायदा घेतला.व त्या रात्री नक्की वेळ माहिती नाही.सकाळी ६.३० वाजे पूर्वी कधीतरी त्यांच्या घराचे कुलूप तोडून घरात आत प्रवेश केला व त्यांच्या घरातील चिजवस्तूंची उचकापाचक करून हि चोरी केली आहे.

सदरचे सविस्तर वृत असे की,ब्राम्हणगाव येथील रहिवासी विशाल कुमावत हे शनिवार दि.२५ सप्टेंबर रोजी आपल्या काही कामासाठी बाहेरगावी गेले होते.त्यांचे काम न आटोपल्याने त्यांचे आपल्या घरी रात्री उशिरा येणे झाले नाही.याचा पाळतीवर असलेल्या अज्ञात चोरट्यानी फायदा घेतला.व त्या रात्री नक्की वेळ माहिती नाही.सकाळी ६.३० वाजे पूर्वी कधीतरी त्यांच्या घराचे कुलूप तोडून घरात आत प्रवेश केला व त्यांच्या घरातील चिजवस्तूंची उचकापाचक केली.व त्यांच्या घरातील २० हजार रुपये किमतीचे ७ ग्रॅम वजनाचे जुने नवीन मणी असलेले सोन्याचे पॅडल व १०० व ५०० नोटा असलेले १ हजार ४०० रूपये असे मिळून २१ हजार ४०० रुपयांचा पोबारा केला आहे.हि बाब ते दुसऱ्या दिवशी घरीही आल्यावर त्यांच्या लक्षात आली तो पर्यंत उशीर झालाच होता.

या प्रकरणी त्यांनी तातडीने कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात धाव घेऊन अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.घटनास्थळी सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरेश आव्हाड यांनी भेट दिली असून घटनास्थळाची पाहणी केली आहे.

या प्रकरणी कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपी विरुद्ध पोलिसानी आपल्या दप्तरी गुन्हा क्रं,३४६/२०२१ भा.द.वि.कलम ४५७,३८० प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या प्रकरणी पुढील ताप्पासपोलिस निरीक्षक दौलतराव जाधव यांचे मार्गदर्शनाखाली पो.हे.कॉ.ए.एम.आंधळे हे आक्रीत आहेत.त्यामुळे ग्रामीण भागात चोरट्यांची दहशत पसरली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close