गुन्हे विषयक
कोपरंगाव नजीक एकाचा मृत्यू,पोलिसात नोंद
न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव शहरानाजीक एक अंदाजे चाळीस वर्षीय ईसमाचा मोहिनीराज नगर स्मशान भूमी जवळ गोदावरी नदी पात्रात अज्ञात कारणामुळे मृत्यू झाला असून याबाबत रुगवाहिका चालक अमित खोकले यांनी कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात खबर दिली असून कोपरगाव शहर पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.
सदरचे सवित्तर वृत्त असे की,खबर देणार अमित साहेबराव खोकले यांना काही नागरिकांनी दि.१३ सप्टेबर रोजी सकाळी ८.३० वाजेपुर्वी खबर दिली की,मोहिनीराजनगर हद्दीत गोदावरी नदी पात्रात स्मशान भूमीजवळ एका चाळीस वर्षीय इसमाचा मृत्यू झालेला आहे.त्या शवाच्या अंगात कपडे नाही.व ते गोदावरी नदी पात्रात वाहत आलेले असावे असा कयास आहे.याबाबत त्यांनी घटनास्थळी धाव घेतली असता ती बातमी खरी निघाली.त्यांनी याबाबत कोपरगाव शहर पोलिसांना याची माहिती दिली व त्याचा पंचनामा करून ते शव ताब्यात घेऊन पुढील कार्यवाहीसाठी कोपरगाव ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आले आहे.
कोपरगाव शहर पोलिसानी या प्रकरणी अकस्मात मृत्यू नोंद पुस्तिका क्रं.४७/२०२१ सी.आर.पी.सी.१७४ प्रमाणे नोंद केली आहे.पुढील तपास पोलीस निरीक्षक वासुदेव देसले यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार एस.सी.पवार हे करीत आहेत.