कोपरगाव तालुका
डांबरी रस्त्यावरील खड्डे डांबरानेच बुजवावेत-माजी नगराध्यक्ष पाटील
न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव नगरपरिषद हद्दीत रस्त्यांची वाट लागली असून त्याचा नागरिकांना नाहक त्रास होत असून पालिका खड्डे बुजविण्यास मुरुमाचा वापर करत त्याला हरकत घेतली असून हे चुकीचे असल्याचे प्रतिपादन कोपरगाव नगरपरिषदेचे अध्यक्ष मंगेश पाटील यांनी नुकतेच एका प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.
“खरे तर डांबरी रस्त्यांवर कधीही मुरूम टाकायचा नसतो आणि रोलिंग तर मुळीच नाहीच,कारण रोलिंग केले की मुरुमाची लगेच माती होती.तसेच नुसता मुरूम जरी टाकला तर सरळ आहे की,त्यावर वाहने-गाड्या जाऊन त्याची माती होते.आणि पावसाळ्यात तर कधीच मुरूम टाकू नये कारण पाऊस पडला तर स्वाभाविकपणे त्याचा चिखल होतो आणि मोटर सायकल व पायी चालणारे नागरिक घसरगुंडी होऊन तोंडघशी पडतात व त्यांना दुखापत होते.चारचाकी गाडीने चिखल रस्त्याने जाणाऱ्या नागरिकांवर उडतो.नंतर पाऊस गेला आणि वातावरण कोरडे झाले की त्याची धूळ तयार होते व सर्व गावभर त्याचा त्रास होतो”-मंगेश पाटील,माजी नगराध्यक्ष कोपरगाव नगरपरिषद.
कोपरगाव नगरपरिषदेत वर्तमानात रस्त्यांची दुर्दशा हटविण्यासाठी पालिकेने २९ कामांची निविदा काढली होती.मात्र आगामी नोव्हेम्बर महिन्यात होत असलेल्या निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन त्या कामांचे श्रेय जाऊ नये यासाठी पालिकेत बहुमतात असलेल्या माजी आ.कोल्हे गटाने नेहमीच्या सवयी प्रमाणे आकंठ विरोध सुरु केला आहे.त्यामुळे कोपरगाव नगरपरिषद हद्दीतील रस्त्यांची वाट लागली आहे.रस्त्यावरून जाणे म्हणजे धाडस ठरत असून हि जोखीम नागरिकांना संकटात लोटत आहे.यावरून शहरात प्रतिकूल प्रतिक्रिया उमटत आहे.त्यामुळे पालिकेच्या बांधकाम विभागाने तात्पुरती मुरुमाच्या माध्यमातून डागडुजी सुरु केली आहे.त्याला माजी नगराध्यक्ष मंगेश पाटील यांनी एका प्रसिद्धी पत्रकान्वये हरकत घेतली आहे.त्यात हा मुद्दा अधोरेखित केला आहे.
त्यात त्यांनी पुढे म्हटले आहे की,”खरे तर डांबरी रस्त्यांवर कधीही मुरूम टाकायचा नसतो आणि रोलिंग तर मुळीच नाहीच,कारण रोलिंग केले की मुरुमाची लगेच माती होती.तसेच नुसता मुरूम जरी टाकला तर सरळ आहे की,त्यावर वाहने-गाड्या जाऊन त्याची माती होते.आणि पावसाळ्यात तर कधीच मुरूम टाकू नये कारण पाऊस पडला तर स्वाभाविकपणे त्याचा चिखल होतो आणि मोटर सायकल व पायी चालणारे नागरिक घसरगुंडी होऊन तोंडघशी पडतात व त्यांना दुखापत होते.चारचाकी गाडीने चिखल रस्त्याने जाणाऱ्या नागरिकांवर उडतो.नंतर पाऊस गेला आणि वातावरण कोरडे झाले की त्याची धूळ तयार होते.आणि सर्वे गावभर धुराडा उठतो,नाका तोंडात,डोळयांत धूळ जाते.श्वसनाचे ही आजार होतात.यांचा सर्वे वाहन चालकांना आणि विशेष करून व्यापारी आणि दुकानदारांना खूप त्रास होतो.दुकान व त्यातील समानावर खूप धूळ बसते आणि त्या मुळे नुकसान सहन करावे लागते.साफ सफाई चा खूप त्रास होतो.आपल्याला त्यामुळे हेच कळत नाही की ईतके साधे आणि सोपे गणित असताना पालिका हा गोंधळ का करत आहे.नगरपालिका खड्डे बुजवण्याचे,देखभालीचे वार्षिक निविदा काढत असते.आणि ज्याला रस्त्याचे काम दिले त्यानें त्याचे काम झाल्यावर काही महिने किंवा वर्ष,निविदे मधील अटी व शर्तीनुसार ते डागडुजी करण्याची तरतूद असते.किंवा मुदत संपली असेल तर नगरपालिकेने डांबरी रस्त्यावरील किंवा काँक्रिट रस्त्यावरील खड्डे फक्त डांबराने व काँक्रिट रस्त्यावरील काँक्रिटने बुजवण्याचे वार्षिक निविदा काढणे गरजेचे असते.मग पालिका हे सर्व तरतूद का करत नाही ? वास्तविक हे काम उन्हाळ्यात केले असते तर आज हि नामुष्कीची वेळ आली नसती.मात्र नागरिकांना नवीन रस्त्याचे गाजर दाखवत साधे खड्डे बुजविण्याची तसदी घेतली गेली नाही.नवीन रस्ते होई पर्यंत डांबरी मटेरियलने खड्डे जर बुजवले तर आगाऊ पट्टी भरणाऱ्या नागरिकांना मुरूम टाकून जो त्रास झाला तो झाला नसता असा सल्लाही माजी नगराध्यक्ष मंगेश पाटील यांनी शेवटी दिला आहे.