जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
गुन्हे विषयक

सामायिक विहिरीच्या पाण्यावरून तुंबळ हाणामारी,कोपरगावात पाच जणांविरुद्ध गुन्हा

न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव तालुक्यातील देर्डे-कोऱ्हाळें ग्रामपंचायत हद्दीत रहिवासी असलेले आरोपी त्रिंबक हिरामण पवार,अनिल त्रिंबक पवार,किरण त्रिंबक पवार,हिराबाई त्रिंबक पवार,मोनिका अनिल पवार आदींनी सामायिक पाणी भरण्याची विहिरीच्या कारणावरून आपल्याला व आपल्या कुटुंबातील सदस्यांना मारहाण केली असल्याची फिर्याद माणिक हिरामण पवार यांनी कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात दिली आहे.या घटनेत फिर्यादी स्वतः व त्यांची पत्नी लताबाई माणिक पवार मुलगी संगीता माणिक पवार आदि तीन जण जखमी झाले असल्याची माहिती उपलब्ध झाल्याने तालुक्यात खळबळ उडाली आहे.

फिर्यादी माणिक पवार हे देर्डे कोऱ्हाळे येथील रहिवासी असून त्यांचा व आरोपी त्रिंबक पवार यांचे कुटुंबाशी सामायिक विहिरीवरून वाद आहे.तसेच जाण्यायेण्याच्या रस्त्यावरून वाद आहे.याच वादाचे पर्यवसान नुकतेच हाणामारीत झाले आहे.त्यात आरोपी त्रिंबक हिरामण पवार,अनिल त्रिंबक पवार,किरण त्रिंबक पवार,हिराबाई त्रिंबक पवार,मोनिका अनिल पवार आदींनी एकत्र येऊन हि हाणामारी केली आहे.

सदरचे सविस्तर वृत्त असे की,फिर्यादी माणिक पवार हे देर्डे कोऱ्हाळे येथील रहिवासी असून त्यांचा व आरोपी त्रिंबक पवार यांचे कुटुंबाशी सामायिक विहिरीवरून वाद आहे.तसेच जाण्यायेण्याच्या रस्त्यावरून वाद आहे.याच वादाचे पर्यवसान नुकतेच हाणामारीत झाले आहे.त्यात आरोपी त्रिंबक हिरामण पवार,अनिल त्रिंबक पवार,किरण त्रिंबक पवार,हिराबाई त्रिंबक पवार,मोनिका अनिल पवार आदींनी एकत्र येऊन गैर कायद्याची मंडळी एकत्र करून फिर्यादी माणिक पवार व तात्यांच्या घरातील त्यांची पत्नी लताबाई पवार,त्यांची मुलगी संगीता पवार यांना आधी वाईट-वाईट शिवीगाळ करून त्या नंतर लोखंडी पाईपच्या सहाय्याने व लाथा बुक्यांनी मारहाण केली आहे.व आमच्या नदी लागले तर जिवंत सोडणार नाही अशी धमकी दिली आहे.या बाबत फिर्यादी पवार याने कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

कोपरगाव तालुका पोलिसांनी या प्रकरणी आपल्या दप्तरी आरोपी विरुद्ध गु.र.क्रं.३०६/२०२१ भा.द.वि.कलम १४३,१४७,१४८,१४९,३२४,३२३,५०४,५०६ प्रमाणे प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.पुढील तपास पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव यांचे मार्गदर्शनाखाली पो.हे.कॉ.सतिष.एन.भताने करीत आहेत,

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close