जाहिरात-9423439946
गुन्हे विषयक

कोपरगाव तालुक्यात अज्ञात चोरट्याने मारला डिकीवर डल्ला

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव तालुक्यातील देर्डे-कोऱ्हाळे ग्रामपंचायत हद्दीतील ओम साई लॉन्स येथील सौचालयात नैसर्गिक विधीसाठी आपली दुचाकी लावून फिर्यादी संदीप पुंडलिक डुबे (वय-४१) हे गेले असता त्यांच्यावर पाळत ठेऊन असलेल्या अज्ञात चोरट्याने त्यांच्या दुचाकीच्या डिकीतील एक १५ हजार रुपयांची सोन्याची अंगठी व रोख ६०० रुपयांची रोकड असा एकूण १५ हजार ६०० रुपयांचा ऐवज लंपास केला असल्याने कोपरगाव तालुक्यात खळबळ उडाली आहे.

फिर्यादी संदीप डुबे हे बाहेर गावी जाण्यासाठी आपल्या दुचाकीवरून निघाले असता त्यांना नैसर्गिक विधीची गरज भासली.त्यांनी आपला प्रवास थांबवुन ते नजीक असलेल्या ‘ओम साई लॉन्स’ येथील सौचालयात गेले असता त्यांच्यावर पाळत ठेऊन असलेल्या अज्ञात चोरट्याने त्यांच्या डिकीतील रोकड व सोन्याची अंगठीवर डल्ला मारला आहे.

सदरचे सविस्तर वृत्त असे की,वर्तमानात कोरोना साथीचा कालखंड सुरु असून अनेक चोरटे ग्रामस्थांना विविध क्लुप्त्या दाखवून आपली हात की सफाई दाखवत आहे.अशीच घटना कोपरगाव तालुक्यातील देर्डे कोऱ्हाळें ग्रामपंचायत हद्दीत घडली असून फिर्यादी संदीप डुबे हे बाहेर गावी जाण्यासाठी आपल्या दुचाकीवरून निघाले असता त्यांना नैसर्गिक विधीची गरज भासली.त्यांनी आपला प्रवास थांबवुन ते नजीक असलेल्या ‘ओम साई लॉन्स’ येथील सौचालयात गेले असता त्यांच्यावर पाळत ठेऊन असलेल्या अज्ञात चोरट्याने नेमक्या संधीचा फायदा उपटला आहे.ते आपला नैसर्गिक विधी आटोपून आपल्या दुचाकींजवळ आले असता तेथे त्यांना आपल्या दुचाकीच्या डिकीची उचकपाचक केलेली आढळून आली. त्यांनी त्या बाबत शोध घेतला असता त्यांच्या डिकीतील एक अंदाजे पाच ग्रॅम वजनाची व १५ हजार रुपये किमतीची सोन्याची अंगठी व रोख ६०० रुपये त्यात २०० व १०० किमतीच्या नोटा असा एकूण १५ हजार ६०० रुपयांचा ऐवज अज्ञात चोरट्याने लंपास केला आहे.त्यांनी या प्रकरणी कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात धाव घेऊन गुन्हा दाखल केला आहे.

कोपरगाव तालुका पोलिसांनी आपल्या दप्तरी या अज्ञात चोरट्या विरुद्ध गु.र.क्रं.३०३/२०२१ भा.द.वि.कलम ३७९ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.पुढील तपास पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव यांचे मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार एम.ए.कुसारे हे करित आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close