गुन्हे विषयक
अज्ञात वाहनाची दुचाकीला धडक,वृद्धांचे उपचारा दरम्यान निधन,कोपरगावात गुन्हा
न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव तालुक्यातील येसगाव ग्रामपंचायत हद्दीत येवल्याकडून संगमनेर तालुक्यात आपल्या टी.व्ही.एस.५० या दुचाकीवरून जात असताना बुधवार दि.१४ जुलै रोजी सकाळी ९ वाजता अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत मनोली येथील वृद्ध भीमा नारायण साबळे (वय-८०) हे गंभीररीत्या जखमी झाले होते त्यांना नजीकच्या ग्रामस्थांनी उपचारासाठी प्रथम कोपरगाव येथील रुग्णालयात व तेथून लोणी येथील ग्रामीण रुग्णालयात भरती केले असता तेथे उपचारादरम्यान त्यांचे निधन झालं असल्याची बातमी प्राप्त झाली आहे.या प्रकरणी कोपरगाव तालुका पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.
सदरचे सविस्तर्व वृत्त असे की, मयत इसम हे आपल्या नातेवाईकांकडे भेटण्यास गेले होते.ते भेटून घरी परतत असताना बुधवार दि.१४ जुलै रोजी सकाळी नऊ वाजेच्या सुमारास समोरून येणाऱ्या अज्ञात वाहनाने त्यांना जोराची धडक दिली होती.त्यात ते गंभीर जखमी झाले होते.त्यांना नजिकच्या ग्रामस्थांनी रुग्णवाहिका बोलावून प्रथम संत जनार्दन स्वामी रुग्णालय येथे उपचारार्थ दाखल केले व नातेवाईकांना त्याची खबर दिली होती.नातेवाईकांनी घटनेचे गांभीर्य ओळखून त्यांना लोणी येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले होते.मात्र उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली आहे.या प्रकरणी लोणी येथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी या घटनेबाबत लोणी पोलिसांना माहिती दिली होती.त्यांनी या प्रकरणी कोपरगाव तालुका पोलिसांना त्या घटनेची खबर दिली असून कोपरगाव तालुका पोलिसानी आपल्या दप्तरी अकस्मात मृत्यू नोंदणी पुस्तिका क्रं.३२/२०२१ सी.आर.पी.सी.१७४ प्रमाणे नोंद केली आहे.पुढील तपास पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव यांचे मार्गदर्शनाखाली पो.हे.कॉ.ए. एम.आंधळे हे करीत आहेत.