जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

गट तट विसरूनच गावाचा विकास शक्य-कोपरगाव तालुक्यात दिशादर्शन !

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

राज्याच्या विकासासाठी सर्वांना सोबत घेवून महाविकास आघाडी सरकार अतिशय चांगल्या प्रकारे काम करीत असून राज्यातील प्रत्येक ग्रामपंचायतीने देखील गट तट विसरुण राजकारण बाजूला ठेवून एकत्रित आल्यास प्रत्येक गावाचा विकास करणे सहज शक्य असल्याचे प्रतिपादन आ.आशुतोष काळे यांनी डाऊच खुर्द ग्रामपंचायत हद्दीत एका कार्यक्रमात बोलताना केले आहे.

“तालुक्यातील शेतीला वरदान ठरणाऱ्या गोदावरी कालव्यांची दुरावस्था झाल्यामुळे वहनक्षमता कमी होऊन शेतीला वेळेवर आवर्तनाचा लाभ मिळत नव्हता.त्याबाबत जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा केल्यामुळे २०२१-२२ च्या अर्थसंकल्पात ४०० कोटी रुपये गोदावरी कालव्यांच्या दुरुस्तीसाठी मंजूर करण्यात आले असून प्रत्येक वर्षाला १०० कोटी रुपये देण्यात येणार आहे. त्यापैकी चालू वर्षी आजपर्यंत ५५ कोटी रुपये निधी मिळाला”-आ.आशुतोष काळे.

जिल्हा परिषद वार्षिक योजनेअंतर्गत डाऊच खुर्द येथे बांधण्यात आलेल्या अंगणवाडी इमारतीचे लोकार्पण व चांदेकसारे येथे बांधण्यात येणाऱ्या प्राथमिक शाळा इमारतीचे भूमिपूजन आ. काळे यांच्या शुभहस्ते पार पडले याप्रसंगी ते बोलत होते.

सदर प्रसंगी सभापती पोर्णिमा जगधने,उपसभापती अर्जुन काळे, सदस्य अनुसया होन,अनिल कदम,ॲड.राहुल रोहमारे,कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे संचालक आनंदराव चव्हाण, रोहीदास होन,गौतम बँकेचे उपाध्यक्ष धोंडीराम वक्ते,गोदावरी खोरे केन ट्रान्सपोर्ट कंपनीचे कार्यकारी संचालक दिलीप शिंदे,सरपंच संजय गुरसळ,उपसरपंच स्वाती रणधीर,संतोष पवार,शंकरराव गुरसळ,पंकज पुंगळ, बालम सय्यद,भास्करराव होन, शंकरराव चव्हाण,पंचायत समिती गटविकास अधिकारी सचिनजी सूर्यवंशी, उत्तमराव पवार, केंद्रप्रमुख निळे सर, कुलधरण मॅडम, ग्रामसेवक सुकेकर आदि मान्यवर उपस्थित होते.

त्यावेळी पुढे बोलताना ते म्हणाले की,”साडेचार वर्षापूर्वी विकास करण्याच्या बाबतीत माझ्यावर विश्वास दाखवून ग्रामीण भागातील जनतेने मोठ्या विश्वासाने दिलेली जबाबदारी जिल्हा परिषद,पंचायत समिती सदस्यांनी समर्थपणे पार पाडून संपूर्ण कोपरगाव तालुक्यात मोठ्या प्रमाणात विकासकामे केली आहेत.तोच विश्वास विधानसभा निवडणुकीत मतदार संघातील जनतेने पुन्हा एकदा माझ्यावर दाखविला.माझ्यावर दिलेल्या जबाबदारीचे भान ठेवून मतदार संघातील आरोग्य, शिक्षण रस्ते पाणी आणि वीज या प्रश्नांना नेहमीच प्राधान्य देवून या प्रश्नांना दिले आहेत.संपूर्ण मतदार संघाचा प्रतिनिधी या नात्याने मतदार संघाचा अतिशय महत्वाचा गोदावरी कालव्यांच्या दुरुस्तीचा प्रश्न मार्गी लावला आहे.वर्षानुवर्षापासून झालेली गोदावरी कालव्यांची दुरावस्था झाल्यामुळे वहनक्षमता कमी होऊन शेतीला वेळेवर आवर्तनाचा लाभ मिळत नव्हता.त्याबाबत जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा केल्यामुळे २०२१-२२ च्या अर्थसंकल्पात ४०० कोटी रुपये गोदावरी कालव्यांच्या दुरुस्तीसाठी मंजूर करण्यात आले असून प्रत्येक वर्षाला १०० कोटी रुपये देण्यात येणार आहे. त्यापैकी चालू वर्षी आजपर्यंत ५५ कोटी रुपये निधी मिळाला असल्याचे त्यांनी सांगितले.मतदार संघाच्या विकासासाठी सर्वांचे सहकार्य अपेक्षित आहे. त्यामुळे प्रत्येक गाव विकासाच्या वाटेवर घेवून जाण्यासाठी महाविकास आघाडी सरकारकडून जास्तीत जास्त निधी आणण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे त्यांनीं शेवटी सांगितले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close