गुन्हे विषयक
कोपरगाव तालुक्यात महिलेची आत्महत्या,अकस्मात मृत्यूची नोंद
न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव तालुक्यातील तीळवणी ग्रामपंचायत हद्दीतील रहिवाशी असलेली महिला सोनाली धनंजय गायके (वय-२४) हिने आज सकाळी दहा वाजेच्या सुमारास आपल्या घरी राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली असून तिचे उत्तरीय आज कोपरगाव ग्रामीण रुग्णालयात तपासणीसाठी आणले असून त्यावर प्रक्रिया सुरु आहे.
मयत महिलेचे व तिच्या पती व्यसनी असल्याने त्यांचे अज्ञात कारणावरून वारंवार भांडण होत असल्याची माहिती प्राप्त झाली आहे.आज सकाळी दहा वाजेच्या आधी त्याची पुनरावृति झाल्याची विश्वसनीय खबर आली आहे.मृत महिलेचे माहेर लौकी येथील असल्याची माहिती आहे.व संबंधित नातेवाईक पोलीस ठाण्याकडे गेले असल्याची माहिती प्राप्त झाली आहे.
दरम्यान आज दुपारी कोपरगाव तालुका पोलिसांनी या प्रकरणी ग्रामीण रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी श्री गणबोटे यांच्या प्रथम खबरीवरून अकस्मात मृत्यूची नोंद केली असून पोलिसांचे लक्ष वैद्यकीय अहवालाकडे लागून आहे.या आत्महत्येने कोपरगाव तालुक्याचा पूर्व भाग ढवळून निघण्याची चिन्हे आहेत.यातील मयत महिलेचा पती हा ग्रामपंचायत कर्मचारी असल्याची माहिती प्राप्त झाली आहे.मयत महिलेचे व तिच्या पतीचे काही कारणावरून वारंवार भांडण होत असल्याची माहिती प्राप्त झाली आहे.आज सकाळी दहा वाजेच्या आधी त्याची पुनरावृति झाल्याची विश्वसनीय खबर आली आहे.मृत महिलेचे माहेर लौकी येथील असल्याची माहिती आहे.व संबंधित नातेवाईक पोलीस ठाण्याकडे गेले असल्याची माहिती प्राप्त झाली आहे.या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.त्यामुळे हि आत्महत्या नेमकी कशामुळे केली यावर तालुक्यात उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे.
याबाबत कोपरगाव तालुका पोलिसानी आपल्या दप्तरी अकस्मात मृत्यूची नोंद क्रं.३०/२०२१ सी.आर.पी.सी.१७४ प्रमाणे नोंद केली आहे.पुढील तपास पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव यांचे मार्गदर्शनाखाली पो.हे.कॉ.ए.एम.आंधळे हे करीत आहेत.