कोपरगाव तालुका
लाचखोरीतून..हि महिला तलाठी गजाआड ! दोन दिवसात तिसरी घटना
संपादक-नानासाहेब जवरे
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगावचे तहसीलदार योगेश चंद्रे यांना एकीकडे चांगले कर्तव्य बजावले म्हणून नुकताच वरिष्ठ अधिकाऱ्यानी गौरवले असताना त्यांच्याच कार्यक्षेत्रात कुंभारी पाठोपाठ येसगाव येथील महिला तलाठी ज्योती वसंतराव कव्हळे (वय-३२) हिस प्रतिज्ञापत्रात निर्माण केलेल्या भाराचा तपशील सातबारा उताऱ्यावर नोंदवण्यासाठी तक्रारदाराकडून एक हजार रुपयांची लाच तडजोड करून ८०० रुपये रोख घेताना रंगेहात पकडले गेली असून एका आठवड्यात हि दुसरी घटना घडल्याने कोपरगाव तालुक्यातील महसूल विभागाच्या कार्यशैलीवर प्रश्न चिन्ह निर्माण झाले आहे.
दरम्यान याच पथकाने पारनेर तालुक्यातील कान्हेर पो. पोखरी येथील तलाठ्याकडे अर्ज केला असता तक्रारदार यांचे मामा,आई व मावशी यांचे वारस म्हणून तक्रारदार यांचे मयत आजोबाचे शेतीस नावाची नोंद होणेसाठी अर्ज तीन हजारांची लाच मागीतल्याच्या कारणावरून मंगळवारी सापळा अधिअकारी तथा पोलीस निरीक्षक हरीश खेडकर यांनी आपल्या पथकामार्फत सापळा रचून त्यात लाच घेताना कोतवाल बर्डे यास अटक केली आहे.दोन दिवसात हा तिसरा सापळा होता या धडक मोहिमेबद्दल नागरिकांनी लाचलुचपत विभागाच्या अधिकाऱ्यांचे कौतुक केले आहे.
सरकारच्या प्रत्येक विभागाला लाचखोरीची कीड लागली असली तरी महसूल आणि पोलिस दलामध्ये लाचखोरीची गंभीर समस्या आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या राज्य परिक्षेत्रात केवळ मार्च महिन्यात लाचखोरीची ५८ प्रकरणे समोर आली असून त्यात ८६ आरोपी सापडल्याची नोंद आहे.यामध्ये पोलिस विभागाची सर्वाधिक प्रकरणे आहेत. यामध्ये दुसऱ्या स्थानकावर महसूल विभाग आहे. इतरही विभागाची कमी-अधिक संख्येने प्रकरणे असल्याची माहिती पुढे आली आहे.त्यामुळे प्रत्येकाला सरकारी कार्यालयात लाच दिल्याशिवाय कामे होत नसल्याचा अनेकांना प्रत्यय सातत्याने येतो. शिपायापासून वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत प्रत्येक टप्प्यावर लाच मागितली जात असून अनेकदा लोकही लाचखोरीची तक्रार देण्यासाठी पुढे येत नाहीत.त्यामुळे लाचखोरांचे अधिकच फावत आहेत. प्रत्येक सरकारी कार्यालयात फलक लावण्यात आलेले आहेत. या फलकावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे (एसीबी) क्रमांकही आहेत. तरीही त्या प्रमाणात एसीबीकडे तक्रार येत नाहीत.काही वेळा ए.सी.बी.कडून भ्रष्टाचाराची उघड चौकशी केली जाते.तसेच लाचखोरीत पकडल्यानंतर आरोपीच्या मालमत्तेची चौकशी होत असल्याने उत्पन्नापेक्षा अधिक संपत्ती आढळल्यास असंपदेचा गुन्हा दाखल करण्यात येतो.परंतु लाचखोरीवर आळा बसणार कधी,हा मोठा प्रश्न असला तरी लाचखोरीमध्ये जनतेचे रक्षणकर्ते पोलिस आणि त्या पाठोपाठ महसूल विभागच अव्वल असल्याचे दिसून येत आहे.
त्याचीच अनूभूती कोपरगाव तालुक्यात काल दुपारी येसगाव तलाठी कार्यालयात आली आहे.नाटेगाव येथील तक्रारदाराने आपल्या प्रतिज्ञापत्रावर निर्माण केलेल्या भाराचा बोजा उताऱ्यावर चढवायचा होता.त्यासाठी या तलाठी महिला ज्योती कव्हळे हिने चक्क एक हजारांची लाच मागितली होती तडजोडी अंती तक्रारदार हा ८०० रुपये देण्यास तयार झाला असताना तक्रार दाराने दरम्यान लाच लुचपत विभागाकडे संपर्क साधून आपली व्यथा मांडली व न्याय मागितला त्यावरून नाशिक लाच लुचपत विभागाचे अधीक्षक अभियंता सुनील कडासने यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा अधिकारी तथा पोलीस निरीक्षक चंद्रसेन पालकर व सापळा पथकातील अधिकारी संदीप साळुंके, पो.ना.वैभव देशमुख,प्रवीण महाजन,पो.हा.विनोद पवार यांनी यांनी हा सापळा यशस्वी केला आहे.त्यामुळे तक्रारदार यास न्याय मिळण्यास मदत झाली आहे.मात्र तालुक्यातील अन्य नागरिकांची पिळवणूक कधी थांबणार असा सवाल नागरिकांनी विचारला आहे.यापूर्वी कुंभारी येथे साबणे या तलाठ्याने पाच हजारांची लाच घेतांना रंगेहात पकडले होते.त्यामुळे हि जिल्ह्यातील तिसरी कारवाई ठरली आहे.